नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वतीने ६५ वा रेल्वे सप्ताह समारंभ नुकताच बिलासपूरमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी यांनी उल्लेखनीय कार्यासाठी झोन मुख्यालय व तीनही विभागातील १० अधिकारी आणि ११० कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले. तीनही विभागातील विविध विभागात ४७ उत्कृष्टता शिल्ड प्रदान करण्यात आल्या. या वेळी महाव्यवस्थापक बॅनर्जी यांनी नागपूर विभागाला १२ पदके प्रदान केली. याशिवाय नागपूर विभागाच्या विविध विभागातील २८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ए. के. सूर्यवंशी, गोरक्ष व्ही. जगताप यांनी पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा आणि उत्तम कार्यामुळे हे यश मिळाले असल्याचे प्रतिपादन ‘डीआरएम’ मनिंदर उप्पल यांनी केले. हे यश नागपूर विभागासाठी गर्वाची बाब असून यापुढेही रेल्वेगाड्यांचे उत्तम संचालन आणि प्रवासी सुविधांसाठी विभाग कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दपूम रेल्वे नागपूर विभाग १२ पदकांनी सन्मानित ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:06 AM