शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अंधांच्या प्रवासातील दीपस्तंभ !

By admin | Published: September 05, 2015 3:14 AM

वर्तमानात शिक्षक आणि शिक्षणाची संकल्पनाच बदलली आहे. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण झाले आहे.

मंगेश व्यवहारे नागपूरवर्तमानात शिक्षक आणि शिक्षणाची संकल्पनाच बदलली आहे. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण झाले आहे. शिक्षकी पेशाला केवळ अर्थार्जनाचे माध्यम म्हणून बघितले जात आहे. अशा परिस्थितीत देवराव मेश्राम सरांच्या शिक्षणातील समर्पणाने शिक्षणक्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी दृष्टिहीन मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना आपल्या पायावर उभे केले आहे. गेल्या ३५ वर्षापासून ते ‘सरस्वती’ची सेवा करीत आहे. भंडारा जिल्ह्यातील सावरगाव या लहानशा गावात देवराव मेश्राम यांचा जन्म झाला. जन्मत:च त्यांच्या नशिबी अंधत्व आले. वडील शेतकरी, त्यावेळी घरची परिस्थिती अत्यंत बिकट. मुलगा अंध जन्माला आल्याने, आई-वडील नशिबालाच दोष देत होते. मुलाचे काय होईल, ही चिंता त्यांना सतत भेडसावत होती. मात्र गावातील कुथे नावाच्या शिक्षकाने देवराव मेश्राम यांना सामान्यांच्या शाळेत प्रवेश दिला. त्यांची गुणवत्ता शिक्षकाच्या लक्षात आल्याने, त्यांनी भंडाऱ्यातील अंध शाळेत दाखल केले. तिथे ब्रेलमध्ये त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. पुढचे शिक्षण त्यांनी सामान्य मुलांच्या शाळेत घेतले. परिस्थिती नसल्यामुळे ४ किलोमीटर दररोज पायी शाळेत जाऊन, दहावीत अंध विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता यादीत ते आले. पुढे त्यांनी एमए पर्यंतचे शिक्षण नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये घेतले. १९८० मध्ये द ब्लाईंड रिलीफ असोसिएशन नागपूरद्वारा संचालित अंध विद्यालयात विशेष शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मध्य भारतातील अंध विद्यार्थ्यांची ही संस्था आहे. या संस्थेत त्यांनी अंध विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य सुरू केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीबरोबर, त्यांचे कौटुंबिक प्रश्न सोडविण्याचे त्यांनी प्रयत्न केले. ग्रामीण भागातील अंध विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. निव्वळ शिक्षणच नाही, तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या कर्मशाळेत विविध कामाचे प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागातील अंध विद्यार्थ्यांना छोटेमोठे उद्योग लावून देऊन, त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. अंध मुलींचे विवाह करून दिले.