शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपूरची कन्या प्रीती करणार अमेरिकेत कँसर उपचारावर संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:28 PM

जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर नागपूरच्या एका सामान्य मुलीने जपानच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक स्तरावरील संशोधकांवर आपली छाप सोडली. तिच्या चिकित्सक वृत्तीची दखल घेत परिषदेत उपस्थित संशोधकांनी तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठात ती कॅन्सरवर औषध निर्माण करण्यासाठी संशोधन करणार आहे.

ठळक मुद्देजापानमधील संशोधकांची परिषदही गाजवलीअत्यंत सामान्य कुटुंबात जन्म

आॅनलाईन लोकमतनागपूर : जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर नागपूरच्या एका सामान्य मुलीने जपानच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक स्तरावरील संशोधकांवर आपली छाप सोडली. तिच्या चिकित्सक वृत्तीची दखल घेत परिषदेत उपस्थित संशोधकांनी तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठात ती कॅन्सरवर औषध निर्माण करण्यासाठी संशोधन करणार आहे. त्यासाठी तिला फेलोशिप मिळाली आहे.या नागपूरकर मुलीचे नाव डॉ. प्रीती फाटे आहे. प्रीती ही अतिशय सामान्य कुटुंबातील मुलगी. तिचे शिक्षण नागपूर विद्यापीठातून झाले. नागपूर विद्यापीठातून एमएस्सी करताना ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. पुढे तिने देशातील सर्वात कठीण सीएसआयआर नेट ही परीक्षा उत्तीर्ण केली व रायगड येथील जेएसएम महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून ती रुजू झाली. सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही प्रीती स्वस्थ बसली नाही. तिने ‘मिक्झोमायसिटीज’ या विषयावर संशोधन करून, पीएच.डी. मिळविली. जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तिच्या संशोधनाची जागतिक स्तरावरील संशोधकांनी प्रशंसा केली. तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ती आता अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठात कॅन्सरवर औषध निर्माण करण्यासाठी संशोधन करणार आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरcancerकर्करोग