लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आगामी शनिवार व रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला खापा (ता. सावनेर) शहरातील छाेट्या-माेठ्या व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. या बंदमुळे आर्थिक नुकसान हाेत असल्याच्या प्रतिक्रिया छाेट्या व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.
या बंदमधून शासकीय व खासगी दवाखाने, औषधी व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने आणि पेट्राेलपंप व गॅस वितरण वगळण्यात आले आहे. या दाेन दिवसाच्या बंदमुळे काेराेना संक्रमित रुग्णांची संख्या फारशी कमी हाेताना दिसून येत नाही. उलट, दुकाने बंद ठेवून आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असेही काही दुकानदार व व्यापाऱ्यांनी सांगितले. या बंदच्या काळात काही प्रमाणात बससेवा व खासगी प्रवासी वाहतूक सुरू राहत असल्याने नागरिकांचे येणे-जाणे सुरू राहते. शिवाय, बसस्थानकावरही प्रवाशांची माेठी गर्दी दिसून येते. यात काेण काेराेना पाॅझिटिव्ह आणि काेण निगेटिव्ह हे कळायला मार्ग नाही. यात कुणीही प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे फारसे पालन करीत नाही. त्यामुळे नागरिकांची ही गर्दी काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत असल्याचे या दुकानदारांनी सांगितले.
दुकाने व हाॅटेल बंद ठेवणे ही काही उपाययाेजना नाही. प्रशासन व कर्मचारी नागरिकांच्या मनात काेराेनाची अप्रत्यक्षरीत्या भीती निर्माण करीत आहे. काेराेना संक्रमण वर्षभरापासून सुरू आहे. दाेन दिवसाच्या बंदमुळे संक्रमण कमी हाेत नाही. मात्र, आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागते, अशी प्रतिक्रिया खापा येथील हाॅटेलमालक उमाकांत गाडीगाेणे यांनी व्यक्त केली. प्रशासनाला बंद ठेवायचा असेल तर किमान १५ ते २० दिवसाचा सलग बंद ठेवावा. दाेन दिवसाच्या बंदमुळे रुग्णसंख्या फारशी कमी हाेत नाही, असे खापा येथील जनरल स्टाेर्स मालक सुधीर नाचणकर यांनी सांगितले.