शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

दया नायक यांची सात वर्षात विदर्भात दुसऱ्यांदा बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:08 AM

नरेश डोंगरे! लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेला पोलीस निरीक्षक दया नायक ...

नरेश डोंगरे!

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेला पोलीस निरीक्षक दया नायक यांची सात वर्षात विदर्भात झालेली ही दुसरी बदली आहे. यापूर्वी त्यांनी नागपुरात रुजू होण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे आता ते जात पडताळणी प्रमाणपत्र तपासण्यासाठी गोंदियात रुजू होणार का, असा प्रश्न पोलीस दलात चर्चेला आला आहे.

''नाम ही काफी है'', अशी स्वतःची प्रतिमा तयार करणारे दया नायक

१९८५ ला मुंबई पोलीस दलात रुजू झाले होते. अंडरवर्ल्डमधील अनेक कुख्यात गुंडांचा एकापाठोपाठ एन्काउंटर करून दया नायक यांनी प्रचंड दरारा निर्माण केला होता. यानंतर राज्यातील काही नेते तसेच पोलीस दलातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांचे लाडके म्हणूनही नायक यांची ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस दलच नव्हे तर बॉलीवूडलाही दया नायक या नावाने भुरळ घातली होती. या पार्श्वभूमीवर, २००६ मध्ये कर्नाटक येथे नायक यांनी त्यांच्या आईच्या नावे बांधलेल्या शाळेचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी उद्घाटन केले आणि तेथून नायक यांचे वासे फिरले. नायक यांच्या बेहिशेबी मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी, अटकेची कारवाई झाली. त्यानंतर मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले.

२०१२ मध्ये त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले आणि जानेवारी २०१४ मध्ये त्यांची नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली. त्यावेळी नागपुरात रुजू होण्यास नायक यांनी स्पष्ट नकार दिला होता, त्यांचे हे वर्तन पुन्हा त्यांना अडचणीत आणणारे ठरले आणि २०१५ मध्ये त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आले; मात्र वर्षभरात ते पुन्हा मुंबईत झाले. सध्या मुंबई एटीएसमध्ये ते सेवारत होते. आज त्यांची चक्क गोंदियाला बदली झाल्याचा आदेश निघाला. त्यामुळे राज्य पोलीस दलात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. दया नायक गोंदियात रुजू होतील का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

---

कसे रमणार जात पडताळणीत?

घोड्याचे अचूक तंत्र अवगत असणारे आणि भल्याभल्या गुंडांना कंठस्नान घालणारे दया नायक जात प्रमाणपत्र पडताळणीत कसे रमतील, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मुंबई, नागपूरसह ठिकठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दया नायक गोंदियात रुजू होणार नाही, असे आपले नाव न छापण्याच्या अटीवर ठामपणे सांगितले आहे. तर ते येथे रुजू होणे म्हणजे, चमत्कार ठरेल, असेही काहींनी म्हटले आहे.

--