लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सर्व बाजूने टीका सुरू झाल्यामुळे शेवटी सोमवारी सायंकाळी जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) विद्यमान कार्यकारिणीने त्यांच्या सर्व जबाबदाºया निवडणूक समितीकडे हस्तांतरित केल्या. याप्रसंगी अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.ज्येष्ठ वकील अॅड. के. बी. आंबिलवाडे निवडणूक समितीचे अध्यक्ष असून प्राथमिक सदस्यांमध्ये शैलेश दडिया, पी. के. मिश्रा व अब्दुल बशीर यांचा समावेश आहे. हे चौघे समितीमध्ये अन्य आवश्यक सदस्यांचा समावेश करतील. निवडणूक समितीकडे संघटनेचे सर्व अधिकार आल्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता खऱ्या अर्थाने जिल्हा न्यायालयात निवडणुकीचे वारे सुरू होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक येत्या आॅक्टोबरच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी काही वकिलांनी स्वत:ची उमेदवारी घोषित केली आहे. त्यांनी वैयक्तिकरीत्या व सोशल मीडियावरून प्रचार सुरू केला आहे.मावळत्या कार्यकारिणीचा दोन वर्षांचा कार्यकाळ २२ जानेवारी २०१७ रोजीच संपला आहे. परंतु, ते आतापर्यंत पदावर कायम होते. यापूर्वीची कार्यकारिणीही अशीच वागली होती. त्या कार्यकारिणीने कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल १८ महिने खुर्च्या सोडल्या नव्हत्या. त्या कार्यकारिणीत अॅड. सुदीप जयस्वाल अध्यक्ष तर, अॅड. मनोज साबळे सचिव होते. त्यावेळी संबंधित कार्यकारिणीवर बरीच टीका झाली होती. कोंडी असह्य झाल्यानंतर त्या कार्यकारिणीने निवडणूक जाहीर केली होती. त्यानंतर २३ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. प्रकाश जयस्वाल तर, सचिवपदी अॅड. नितीन तेलगोटे विजयी झाले होते. जिल्हा विधिज्ञ संघटनेला सन्मानजनक इतिहास आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये अंतर्गत राजकारण व वैयक्तिक स्वार्थामुळे संघटनेच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले हे येथे उल्लेखनीय.नवीन सदस्यांची वैधता तपासानिवडणूक जिंकण्यासाठी संघटनेत आपापल्या मर्जीतील नवीन सदस्यांची नोंदणी केली जात आहे. त्या सदस्यांची वैधता तपासण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणी करणाऱ्यांमध्ये बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे माजी उपाध्यक्ष अॅड. अनिल गोवारदीपे, अॅड. राजेश नायक, अॅड. रजनीश पोद्दार, अॅड. किशोर पकाडे, अॅड. राजेश रानगीरकर, अॅड. राजेंद्र चौधरी, अॅड. आर. डी. कोचे, अॅड. आर. एच. विरसेन आदींचा समावेश आहे.
‘डीबीए’च्या जबाबदाऱ्या निवडणूक समितीकडे हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:39 AM
सर्व बाजूने टीका सुरू झाल्यामुळे शेवटी सोमवारी सायंकाळी जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) विद्यमान कार्यकारिणीने त्यांच्या सर्व जबाबदाºया निवडणूक समितीकडे हस्तांतरित केल्या. याप्रसंगी अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ठळक मुद्देसर्व पदाधिकारी उपस्थित : आॅक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता