लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘व्हीएनआयटी’तील प्राध्यापक डॉ.वीरेंद्र विक्रम अवस्थी यांचा मृत्यू डेंग्यूने झाला असे बोलले जात असलेतरी महापालिकेने त्यांच्या रक्ताचे नमुने मंगळवारी तपासले असता ते ‘निगेटीव्ह’ आले. विशेष म्हणजे, जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत येथील डेंग्यू संशयित ५८ विद्यार्थ्यांच्या रक्ताची तपासणी केली असता दोनच विद्यार्थी पॉझिटीव्ह आल्याचे महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाचे म्हणणे आहे.‘व्हीएनआयटी’मधील १०० विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण व याच आजाराने एका सहायक प्राध्यापकाच्या मृत्यू झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात या महाविद्यालयातील दोन, आॅगस्ट महिन्यात नऊ, सप्टेंबर महिन्यात २३, आॅक्टोबर महिन्यात २० तर नोव्हेंबर महिन्यात चार विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी मनपाकडे पाठविण्यात आले होते. परंतु या ५८ विद्यार्थ्यांमधून केवळ दोनच विद्यार्थी ‘पॉझिटीव्ह’ आले. याचदरम्यान या विभागाने १३ सप्टेंबरपासून ते आतापार्यंत १५ वेळा भेटी दिल्या. महाविद्यालयाच्या कर्मचाºयांना सोबत घेऊन डेंग्यू अळ्यांचा शोध घेतला. अळ्या आढळून आलेल्या ठिकाणी फवारणी केली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी व झाडीझुडपात साचलेल्या पाण्यातही फवारणी करण्याच्या सूचना दिल्या, असेही या विभागाचे म्हणणे आहे. मंगळवारी या विभागाने ‘व्हीएनआयटी’ला पत्र देऊन शासनाच्या सूचनानुसार कीटकनाशक फवारणी करण्याचे, डेंग्यूच्या अळ्यांच्या शोध घेऊन त्या नष्ट करण्याचे व वेळोवेळी फॉगिंग करावे, या आशयाचे पत्र दिले आहे.‘एलायझा’चाचणी निगेटीव्ह‘व्हीएनआयटी’तील सहायक प्राध्यापक डॉ.वीरेंद्र विक्रम अवस्थी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रामदासपेठ येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. शनिवारी अखेर त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे बोलले जात होते. मंगळवारी त्यांच्या रक्ताचे नमुने हिवताप व हत्तीरोग विभागाला मिळाले.‘एलायझा’ चाचणी केल्यावर अहवाल ‘निगेटीव्ह’ आला. परंतु येथील डॉक्टरांनी सांगितले, डॉ. अवस्थी यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांना रक्तस्राव होत होता. त्यांची अत्यंत गंभीर स्थिती होती. शेवटी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.‘व्हीएनआयटी’मध्ये डेंग्यूचे दोनच रुग्ण‘व्हीएनआयटी’मध्ये आतापर्यंत डेंग्यूचे दोनच रुग्ण आढळून आले आहेत. ज्या सहायक प्राध्यापकांचा मृत्यू झाला त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता ते डेंग्यू निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या महाविद्यालयाला डेंग्यूवरील उपाययोजनेचे पत्र दिले आहे.-डॉ. जयश्री थोटे, अधिकारी, हिवताप व हत्तीरोग विभाग
मृत प्राध्यापक डेंग्यू ‘निगेटीव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:16 AM
‘व्हीएनआयटी’तील प्राध्यापक डॉ.वीरेंद्र विक्रम अवस्थी यांचा मृत्यू डेंग्यूने झाला असे बोलले जात असलेतरी महापालिकेने त्यांच्या रक्ताचे नमुने मंगळवारी तपासले असता ते ‘निगेटीव्ह’ आले.
ठळक मुद्दे‘व्हीएनआयटी’च्या २ विद्यार्थ्यांना डेंग्यू : उपाययोजनेवर मनपाने दिले पत्र