- सुमेध वाघमारेनागपूर : ‘मोमो व्हॉट्स अॅप गेम’, ‘किकी चॅलेंज’ यासारख्या जीवघेण्या ‘गेम्स’च्या चक्रव्यूहात अडकलेल्या तरुणाईत मस्तीभऱ्या धुरासाठी प्रकृतीलाच दावणीला बांधण्याचा ‘ट्रेंड’ वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.एखादी ‘कँडी’ किंवा ‘बिस्कीट’ खाल्ल्यावर थेट नाकातोंडातून जीवघेणा धूर काढण्याच्या ‘चॅलेंज’चे प्रमाण वाढीस लागले आहे. थेट शरीरालाच पोखरणाºया या ‘चॅलेंज’चे नाव ‘ड्रॅगन ब्रेथ’ असे असून, चक्क द्रवरूप ‘नायट्रोजन’मध्ये बुडविलेली ‘बिस्किटे’ किंवा ‘कँडी’ खाण्याचा धोका तरुण पत्करत आहेत. कालपर्यंत कॅनडामधील लोकप्रिय रॅप गायकाने म्हटलेले ‘किकी... डू यू लव्ह मी’ हे लोकप्रिय गाणे म्हणत चालत्या मोटारीच्या पुढील सीटवरून खाली उतरून नृत्य करायचे, असे ‘चॅलेंज’ होते. पोलिसांनी कारवाईचा इशारा (पान ५ वर)
बिस्कीट, कँडीतून प्राणघातक धूर; जीवघेण्या ‘ड्रॅगन ब्रेथ’चे नाका-तोंडातून धूर काढण्याचे ‘चॅलेंज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 6:19 AM