शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

नागपूर कारागृहातील बहुचर्चित खैरलांजी हत्याकांडातील आरोपीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:14 AM

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील आरोपी विश्वनाथ हगरू धांडे याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६५ वर्षीय धांडे गेल्या ९ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता.

ठळक मुद्देकारागृहात ढासळली प्रकृतीसुपर स्पेशालिटीत झाला मृत्यूधंतोली ठाण्यात नोंद

आॅनलाईन लोकमतनागपूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील आरोपी विश्वनाथ हगरू धांडे याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६५ वर्षीय धांडे गेल्या ९ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता.देश-विदेशात चर्चेला आलेले खैरलांजी हत्याकांड भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात २९ सप्टेंबर २००६ ला घडले होते. या हत्याकांडाची धग भंडारा, नागपूर, मुंबईसह राज्यातील विविध शहरात पसरली होती. या हत्याकांडामुळे दगडफेक, जाळपोळ, मोर्चे, आंदोलनांनी अवघा महाराष्ट्रच ढवळून निघाला होता. संसदेतही या निर्घृण हत्याकांडाची दखल घेण्यात आली होती. तत्कालीन राज्य सरकारने जनभावना लक्षात घेत जलदगती न्यायालयात या खटल्याची सुनावणी होणार, असे जाहीर केले होते. राज्यभर आंदोलनांचे लोण उसळल्यानंतर सुमारे ७ महिन्यांनी कोर्टात दाखल झालेल्या आणि दीड वर्षे चाललेल्या या हत्याकांडाचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. भंडारा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ११ पैकी गोपाल सक्रू बिंजेवार, सक्रू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे, प्रभाकर मंडलेकर, जगदीश मंडलेकर, रामू धांडे आणि शिशुपाल धांडे या आठ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली तर, महिपाल धांडे, धर्मपाल धांडे आणि पुरुषोत्तम तितीरमारे यांना मुक्त केले. उच्च न्यायालयात दोन्ही पक्षातर्फे या शिक्षेच्या संबंधाने अपिल करण्यात आले. त्याचा निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोपाल बिंजेवार आणि शिशुपाल धांडे वगळता अन्य सहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना २५ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेला विश्वनाथ धांडे हा ९ वर्षांपासून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदी क्रमांक सी ७६६९ म्हणून बंदिस्त होता. बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री १० वाजून ४८ मिनिटांनी डॉक्टरांनी धांडेला मृत घोषित केले. ही माहिती गुरुवारी सकाळी धंतोली ठाण्यात कळविण्यात आली. धंतोली पोलिसांनी धांडेच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.धांडे दुसरा मृत आरोपीया हत्याकांडात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मृत झालेला धांडे हा दुसरा आरोपी होय, अन्य आरोपींपैकी जगदीश मंडलेकर हा २०१२ मध्ये मृत झाला. मंडलेकर नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना १३ फेब्रुवारी २०१२ ला एका महिन्यासाठी पॅरोलवर खैरलांजी येथे आला होता. त्याला दम्याचा त्रास होता. तो अचानक वाढल्याने त्याच्या पॅरोलचा कालावधी पुन्हा एका महिन्याने वाढविण्यात आला. तो १३ एप्रिलला कारागृहात परत जाणार असताना त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :jailतुरुंगDeathमृत्यू