शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

दोघांचा डोहात बुडून मृत्यू : जन्मदिन ठरला मृत्यूदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 10:00 PM

वाढदिवस साजरा करण्यासाठी नागपूरहून वाकी (ता. सावनेर) असे आलेल्या चौघांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तिघे अंघोळ करण्यासाठी कन्हान नदीच्या डोहात उतरले आणि गटांगळ्या खाऊ लागले. त्यात एकाला वाचविण्यात यश आले असून, दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकी येथे सोमवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील वाकी येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (खापरखेडा) : वाढदिवस साजरा करण्यासाठी नागपूरहून वाकी (ता. सावनेर) असे आलेल्या चौघांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तिघे अंघोळ करण्यासाठी कन्हान नदीच्या डोहात उतरले आणि गटांगळ्या खाऊ लागले. त्यात एकाला वाचविण्यात यश आले असून, दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकी येथे सोमवारी दुपारी घडली.सौरभ ऊर्फ दद्दू सूरज भारद्वाज (१९, रा. भांडेप्लॉट, सक्करदारा, नागपूर) व रोशन रामप्रसाद सुसुंद्रे (२५, रा. दिघोरी, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. सौरभ, रोशन, पंकज परसराम मुळेवार (३५, रा. प्रभातगनर, नरसाळा, नागपूर) व मयूर भारद्वाज, रा. नागपूर हे चौघेही नागपूर शहरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. सौरभचा सोमवारी (दि. १) वाढदिवस होता. त्याने वाढदिवस मित्रांसोबत शहराबाहेर साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि चौघेही सकाळी १० वाजताच्या सुमारास मोटरसायकलींनी वाकी येथे पोहोचले. सुरुवातीला त्यांनी ताजुद्दीन बाबांच्या दरबारात दर्शन घेतले आणि नंतर जवळच असलेल्या कन्हान नदीच्या तीरावर फिरायला गेले.‘एन्जॉय’ करण्यासाठी चौघेही दुपारी २ वाजताच्या सुमारास कालव्यालगतच्या रणजित देशमुख यांच्या शेतातून कन्हान नदीच्या पात्रात उतरले. तिथे मनसोक्त बीअर प्यायले आणि सौरभ, रोशन व पंकज ‘वाकी वूड’ डोहात आंघोळ करण्यासाठी उतरले. मयूर मात्र काठावर उभा होता. ते खोल पाण्यात गेल्याने सुरुवातीला सौरभ व रोशन आणि नंतर पंकज गटांगळ्या खाऊ लागले. त्यातच मयूरने पंकजचा हात धरून बाहेर काढले. याप्रकरणी खापा पोलिसांनी नोंद केली आहे.धोकादायक ‘वाकी वूड’ डोहसौरभ व रोशन पाण्यात गायब होताच मयूर व पंकजने दरबार गाठून पोलीस व नागरिकांना माहिती दिली. माहिती मिळताच खापा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांचे शोधकार्य सुरू केले. दरम्यान, सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, ही घटना ‘वाकी वूड’ डोहात घडली. हा डोह धोकादायक असून, तिथे कुणीही अंघोळ किंवा पोहाण्यासाठी डोहात उतरू नये, या सूचनेचा फलक लावला आहे. शिवाय, फलकावर या डोहात आजवर मृत्यू झालेल्यांची यादीही लावली आहे. तरुण त्या फलकाकडे दुर्लक्ष करीत डोहात उतरतात आणि जीव गमावतात.कळमेश्वर शिवारात चिमुकलीचा शेततळ्यात बुडून मृत्यूतीन वर्षांची चिमुकली खेळता - खेळता शेततळ्याजवळ गेली आणि त्यात पडली. तिच्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कळमेश्वर शिवारात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.श्रद्धा प्रमोद भामरे (३) असे मृत बालिकेचे नाव आहे. प्रमोद भामरे हे वसंतराव हुरकांदे यांच्या कळमेश्वर शिवारातील शेतात असलेल्या घरात कुटुंबासह राहतात. त्या घराच्या शेजारी शेततळे आहे. श्रद्धा नेहमीप्रमाणे घराच्या आवारात खेळत होती. खेळताना ती शेततळ्याजवळ गेली आणि त्यात पडली. काही वेळाने आईने श्रद्धा दिसत नसल्याने तिचा शोध घेतला. ती कुठेही दिसत नसल्याने आईने मामाच्या मदतीने श्रद्धाचा शोध घेतला. मामाला शेततळ्यात बुडबुडे आढळून आल्याने त्याने आत उतरून तपासणी केली. तेव्हा त्याला श्रद्धा गवसली. आई व मामाने तिला लगेच कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. पिकांना पाणी मिळावे, यासाठी शेतात शेततळ्याची निर्मिती केली. पण, तेच शेततळे श्रद्धासाठी काळ ठरले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूriverनदी