नगरधन : जिवंत विद्युत तारा बंद डीपीवर पडून अर्थिंग तारेवर प्रवाहीत विजेच्या धक्क्याने एका म्हशीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात दूध उत्पादक शेतकऱ्याचे ९५ हजाराचे नुकसान झाले. ही घटना नगरधन येथे गुरुवारी (दि.१०) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
नगरधन येथील अशाेक रघुनाथ तडस यांच्या घराच्या अंगणालगत असलेल्या बंद डीपीलगत नेहमीप्रमाणे तीन म्हशी बांधून हाेत्या. दरम्यान, बंद विद्युत डीपीवरून गेलेल्या जिवंत विद्युत तारा बंद डीपीवरून पडून जमिनीवरील अर्थिंग व ओल्या भागात वीज पुरवठा प्रवाहीत झाला. त्यात विजेचा धक्का लागल्याने म्हशी ओरडू लागल्या. ही बाब ध्यानात येताच अशाेक व त्यांच्या पत्नीने धाव घेत म्हशींचे दाेर कापल्याने दाेन म्हशींचा जीव वाचला. मात्र एका गाभण म्हशीचा जागीच मृत्यू झाला. यात तडस यांचे ९५ हजाराचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठी बी. जी. रांचे यांनी पंचनामा केला. याबाबत अशाेक तडस यांनी रामटेक पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली आहे. महावितरणचे अभियंता आशिष टेजे, उपअभियंता पी. कावळे यांनी घटनेची नाेंद केली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
===Photopath===
100621\20210610_110020.jpg
===Caption===
विजेचा तार पडून म्हशीचा जागीच मृत्यू.