नागपूर : कोरोना रुग्णाच्या मृत्यूसंख्येत सलग १७ दिवसांनंतर, गुरुवारी नोंद झाली. मृतांची संख्या १०,१२० वर पोहोचली. आज ८ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या ४,९३,१६४ झाली. विशेष म्हणजे, आमदार निवासात ३५ रुग्ण उपचाराखाली आहेत.
नागपूर जिल्ह्यात गुरुवारी ४,८७७ चाचण्या झाल्या. यात शहरात झालेल्या ३,२४२ चाचण्यांमधून २, तर ग्रामीण भागातील १६३५ चाचण्यांमधून ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला. मागील महिन्यात दोन रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर या महिन्यात आज पहिल्यांदाच मृत्यूची नोंद झाली. शहरात आतापर्यंत ३,४०,१७३ रुग्ण व ५,८९३ मृत्यू, ग्रामीणमध्ये १,४६,१५६ रुग्ण व २६०३ मृत्यू, तर जिल्ह्याबाहेर ६,८३५ रुग्ण व १६२४ मृत्यू झाले आहेत. १० रुग्ण बरे झाल्याने कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या ४,८२,९७५ वर गेली आहे. सध्या कोरोनाचे ६९ रुग्ण सक्रिय आहेत. यातील ४० रुग्ण शहरातील, २६ रुग्ण ग्रामीणमधील, तर १ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे. आमदार निवासात ३५ रुग्ण भरती असताना जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पाठविण्यात येणाऱ्या माहितीत २१ रुग्ण दाखविण्यात आले आहे.
:: कोरोनाची गुरुवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ४,८७७
शहर : २ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ३ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण : ४,९३,१६४
एकूण सक्रिय रुग्ण : ७९
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,९७५
एकूण मृत्यू : १०,१२०