लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी एका मनोरुग्णाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पाठोपाठ चार रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. सोमवारी मृत्यू झालेल्या रुग्णालाही फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. मंदा तडाम (३५) असे मृताचे नाव आहे.सूत्रानुसार, गेल्या वर्षी मंदाला प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती करण्यात आले होते. ती ‘स्क्रिझोफ्रेनिया’ची रुग्ण होती. आठवड्यापूर्वी अचानक तिची प्रकृती खालावल्याने तिला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिला फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्येच भरती असलेल्या चार मनोरुग्णाचा लागोपाठ मृत्यूने शंका उपस्थित केली जात आहे. शुक्रवारी लक्ष्मी (२७), शनिवारी मनोज बुराडे (२५), रविवारी माधुरी महाल्ले (३०) तर सोमवारी मंदा हिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, माधुरी आणि मंदाचा मृत्यू फुफ्फुसाच्या संसर्गाने झाला. यातच सर्वच रुग्ण तरुण होते. यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे.
नागपुरात पुन्हा एका मनोरुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 1:25 AM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी एका मनोरुग्णाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पाठोपाठ चार रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. सोमवारी मृत्यू झालेल्या रुग्णालाही फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. मंदा तडाम (३५) असे मृताचे नाव आहे.
ठळक मुद्दे प्रादेशिक मनोरुग्णालय : चार दिवसांत चार मृत्यू