लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. २९ दिवसांत सात जणांच्या मृत्यूने रुग्णालयात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.पार्वती चवरे (६५) रा. यवतमाळ असे मृत मनोरुण महिलेचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पार्वती चवरे एक वर्षापासून प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत होत्या. त्या स्किजोफ्रेनियाच्या रुग्ण होत्या. त्यांच्यावर वॉर्ड क्र. १८ मध्ये उपचार सुरू होते. महिनाभरापूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. परंतु ते नेण्यास आलेच नाही. यामुळे सामान्य झालेल्या पार्वती चवरे रुग्णालयातच दिवस काढत होत्या. रविवारी सायंकाळी त्यांनी जेवण टाळले. जेवणास प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्यांना आकस्मिक वॉर्ड क्र. २० मध्ये दाखल करण्यात आले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांना तपासले. त्यानंतर त्यांनी जेवण केल्याची माहिती आहे. मात्र, रात्री अचानक काय झाले कुणालाच कळले नाही; सकाळी त्यांचा मृतदेह खाटेवर आढळून आला.दोन कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यूजानेवारी महिन्यात २९ दिवसांमध्ये मनोरुग्णालयाच्या दोन कर्मचाऱ्यांसह पाच रुग्ण असे मिळून सात जणांचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णालयातील कर्मचारी वेगवेगळा तर्कवितर्क लावत असल्याने चर्चेला ऊत आला आहे. यात चार रुग्णांचा मेडिकलमध्ये, चवरे यांचा मनोरुग्णालयात, रुग्णालयाचे कर्मचारी देशमुख यांचा ९ जानेवारी रोजी तर खापर्डे यांचा २३ जानेवारी रोजी मृत्यू झाला.शवविच्छेदनासाठी पाठविले आहेपार्वती चवरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मृत्यूची माहिती दिली आहे.शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण कळू शकेल.-डॉ. प्रवीण नवखरेउपअधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय
नागपूरच्या मनोरुग्णालयात पुन्हा एका मनोरुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 9:35 PM
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. २९ दिवसांत सात जणांच्या मृत्यूने रुग्णालयात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.
ठळक मुद्दे२९ दिवसांत सात मृत्यू