शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

मृताच्या बोटातील अंगठ्या लंपास

By admin | Published: September 23, 2016 2:58 AM

ट्रकने चिरडलेल्या मृत शिक्षकाच्या बोटातील दोन अंगठ्या आरोपीने काढून घेतल्या.

नंदनवनमधील प्रकार : टाळूवरचे लोणी खाणारे नराधम कोण ?नागपूर : ट्रकने चिरडलेल्या मृत शिक्षकाच्या बोटातील दोन अंगठ्या आरोपीने काढून घेतल्या. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी झालेल्या अपघातानंतर हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला. यामुळे सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, टाळूवरचे लोणी खाणारे नराधम कोण, असा प्रश्नही विचारला जात आहे. मूळचे बिहारमधील रहिवासी असलेले उदय शंकरनवल किशोरप्रसाद सिंह (वय ४३) हे रामकृष्णनगर, दिघोरी येथे राहत होते. खासगी क्लासेसमध्ये शिक्षक असलेले उदय सिंह बुधवारी दुपारी २.१५ वाजता आपल्या अ‍ॅक्टिव्हाने (एमएच ४९/ एएफ ६४०२) दिघोरी चौकाकडे जात होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी चारुल (वय १९) हीसुद्धा होती. आदर्शनगर, उमरेड रोडवर स्वाती किराणा दुकानासमोर ट्रक (एमएच ४० / एके ३८८०) च्या आरोपी चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून सिंह यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे दोघेही बापलेक खाली पडले आणि आरोपी ट्रकचालकाने सिंह यांना चिरडले. चारूलच्या डाव्या पायाला व डाव्या डोळयाजवळ किरकोळ मार लागला. अपघातानंतर आरोपी चालक ट्रक घेऊन पळून गेला. या अपघातानंतर मोठा जमाव जमला. तणावाची स्थिती निर्माण झाली. सिंह यांचा मोबाईल बाजूला पडला होता. त्यावरून फोन करून एकाने ही माहिती कुटुंबीयांना कळवली. परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळाल्याने जमावातील काही जणांना सोबत घेऊन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मृतदेह मेडिकलमध्ये हलविला. शवविच्छेदन करण्यापूर्वी सिंह यांच्या हाताच्या बोटातील दोन अंगठ्या अज्ञात आरोपीने लंपास केल्याचे उघड झाले. माणुसकीला काळीमा फासणारी बाब उघड झाल्यानंतर शोकसंतप्त सिंह परिवार आणि त्यांच्या आप्तस्वकीयांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. (प्रतिनिधी)आरोपी चालकाचा छडा लागलामृताच्या टाळूवरचे लोणी खाणारा हा प्रकार असून अंगठ्या लंपास करणारा तो नराधम कोण, त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रकच्या नंबरवरून पोलिसांना मालकाचा पत्ता गवसला. त्याआधारे ठाणेदार सुनील महाडिक यांनी पोलीस उपनिरीक्षक एन. एच. विठोले यांना ट्रकचालक आरोपीचा शोध घेण्यासाठी पाचगाव भागात रवाना केले. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचा शोध लागला नव्हता.