शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

नागपूर क्षेत्रातील पवनीच्या जंगलात वाघ-वाघिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:32 PM

वनविभागाच्या पवनी वन परिसरांतर्गत असलेल्या पुसदा बीटमध्ये वयस्क वाघ व वाघिणीचे मृतदेह आढळले आहे. एकाचवेळी दोन वाघांचे मृतदेह मिळाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देविषप्रयोग झाल्याचा संशयशिकार झाली नसल्याचा अंदाज

ऑनलाईन लोकमतनागपूर : वनविभागाच्या पवनी वन परिसरांतर्गत असलेल्या पुसदा बीटमध्ये वयस्क वाघ व वाघिणीचे मृतदेह आढळले आहे. एकाचवेळी दोन वाघांचे मृतदेह मिळाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.ही घटना नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या पवनी रेंज, पुसदा बीटमध्ये राऊंड टागलाच्या कम्पार्टमेंट क्रमांक ४५४ मध्ये घडली आहे. मृत वाघ-वाघिणीचे वय तीन ते साडेतीन वर्ष असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृत्यू हा दोन ते तीन दिवसापूर्वी झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. घटनास्थळावर वाघाचे दात, नखे व अन्य अवयव शाबूत असल्याने, शिकार केल्याची शक्यता नाकारली जात आहे. मृतदेहाच्या थोड्या अंतरावर मृत गाईच्या डोक्याचा भाग आढळून आला आहे. वाघांनी गायीचे शरीर खाल्ल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी १ वाजता बीट वनरक्षक अरुण गीते हे गस्त घालत असताना, कम्पार्टमेंट ४५४ मध्ये त्यांना दोन वाघाचे शव आढळले. परंतु घटनास्थळ अतिशय आतमध्ये असल्याने मोबाईलचे नेटवर्क न मिळाल्यामुळे, गीते यांना वरिष्ठांना तात्काळ सूचना देणे शक्य झाले नाही. त्याने जंगलाबाहेरून स्थानिक अधिकाऱ्यासह नागपूर कार्यालयातील अधिकाऱ्यानाही सूचना दिली. सायंकाळी ५ वाजता दोन वाघांच्या मृत्यूची सूचना मिळताच उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, प्रफुल्ल भांबूरकर, एनटीसीएचे प्रतिनिधी डॉ. डी.एम. कडू, डॉ. चेतन, डॉ. मंडलिक आदी घटनास्थळी पोहचले. अतिशय दुर्गम भागात घडली घटनापवनी वनक्षेत्र हे नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत येते. हा भाग अतिशय घनदाट आणि उंचावर आहे. हे वनक्षेत्र देवलापार, भंडारा, बालाघाटच्या सीमेला लागून आहे. घटनास्थळापर्यंत पोहचण्यासाठी उंच वाहनाचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे वनअधिकाऱ्यांना त्यांची वाहने बदलवून घटनास्थळावर पोहचावे लागले. शनिवारी शवविच्छेदनप्रकरण वाघांच्या मृत्यूचे असल्यामुळे शवविच्छेदन एनटीसीए प्रतिनिधी व वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात येते. परंतु सूचना मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहचण्यास अंधार झाला होता. त्यामुळे शनिवारी सकाळी दोन्ही वाघांचे शवविच्छेदन करण्यात येईल. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच वाघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

टॅग्स :forestजंगल