लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वर्दळ थांबली आहे. अपघात घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले. यामुळे नागपूर शहरात मृत्यूचे प्रमाण घटले आहे. दररोच विविध कारणांनी ६० ते ६२ लोकांचा मृत्यू होतो. परंतु मागील २५ दिवसात यात घट झालेली आहे. दररोज ४५ ते ४७ लोकांचा मृत्यू होत आहे. शहरातील महापालिकेच्या घाटावरील अंतिम संस्काराची आकडेवारी बघता गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या मार्च महिन्यातील मृत्यूचे प्रमाणात कमी झाले आहे. मार्च २०१९ मध्ये नागपूर शहरात १८२५ लोकांचा मृत्यू झाला होता. यातील १६३८ जणांवर अंतिम संस्कार करण्यात आले तर १८७ जणांना दफन करण्यात आले. मार्च २०२० मध्ये नागपूर शहरात १४१५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यातील १२८६ जणांवर अंतिम संस्कार करण्यात आले तर १२९ जणांचा दफनविधी करण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात मृत्युसंख्या ४१० ने कमी झालेली आहे. एप्रिल महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मृत्यूचा आकडा गेल्या वर्षाच्या तुलेनत घटला आहे. लॉकडाऊ नच्या कालावधीत मनपाच्या दहनघाटावरील अंतिम संस्कार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात कमी झाल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. नागपुरातील बाधित रुग्णांचा आकडा ५६ पर्यंत पोहचला आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. सर्व नागरिक कोरोनाच्या दहशतीत आहेत. असे असतानाच शहरातील मृत्यूंचा आकडा कमी होणे ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.वाहन अपघात कमी झालेनागपूर शहरात दररोज लहान-मोठे १५ ते २० वाहन अपघात होतात. अनेकदा अशा अपघातात बळी जातात. परंतु लॉकडाऊ नमुळे शहरातील रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ थांबली आहे. अत्यावश्यक सेवेची १० ते १५ टक्केच वाहने धावत आहेत. यामुळे महिनाभरात वाहनांचे अपघात जवळपास शून्यावर आले आहेत.
नागपूर शहरातील मृत्यूंची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:32 AM
लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वर्दळ थांबली आहे. अपघात घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले. यामुळे नागपूर शहरात मृत्यूचे प्रमाण घटले आहे. दररोच विविध कारणांनी ६० ते ६२ लोकांचा मृत्यू होतो. परंतु मागील २५ दिवसात यात घट झालेली आहे. दररोज ४५ ते ४७ लोकांचा मृत्यू होत आहे.
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे अपघात कमी झाले : मनपाच्या घाटांवरील नोंदीवरून स्पष्ट