नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील प्रभाव कमी झाला आहे. सलग चार दिवसांपासून मृत्यूची संख्या ९०३१ वर स्थिरावली आहे. गुरुवारी २० नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४,७७,२७० झाली. पॉझिटिव्हिटीचा दर ०.२३ टक्के असून मृत्यूचा दर १.८९ टक्के आहे. आज शहरातील १९ व ग्रामीणमधील ६ असे एकूण २५ बाधित रुग्ण बरे झाले.
नागपूर जिल्ह्यात आज ८४२७ कोरोना संशयित रुग्णांच्या तपासण्या झाल्या. यात शहरात झालेल्या ७१४४ तपासणीतून १६, तर तर ग्रामीण भागात झालेल्या १२८३ तपासणीतून ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरात पॉझिटिव्हिटीचा दर ०.२२ टक्के, तर ग्रामीण भागात हाच दर ०.३१ टक्के होता. शहरात आतापर्यंत ३,३२,६५८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ५२९८ रुग्णांचा जीव गेला. ग्रामीणमध्ये १,४३,००३ रुग्ण, तर २३०६ बळी गेले आहेत. ४,६८,०८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के आहे.
- होम आयसोलेशनचे २३ रुग्ण
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या एप्रिल महिन्यात ७७ हजारापुढे गेली असताना, तीन महिन्यातच हा आकडा २३ वर आला आहे. यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा धोका कमी होत चालला आहे. सध्या १२७ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. अनेक खासगी रुग्णालयांतील कोविडच्या खाटा रिकाम्या पडल्या आहेत.
:: कोरोनाची रविवारची स्थिती...
दैनिक चाचण्या : ८४२७
शहर : १६ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ४ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,७७,२७०
ए. सक्रिय रुग्ण : १५०
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६८,०८९
ए. मृत्यू : ९,०३१