आॅनलाईन लोकमतगडचिरोली : दोन चिमुकल्या भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारच्या सुमारास गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील पोर्ला येथे घडली. अनुप किशोर राऊत (६) व अनुष किशोर राऊत (४) अशी मृत बालकांची नावे आहेत.पोर्ला येथील किशोर राऊत हे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच्या परिसरात आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्य करतात. ते शेतकरी आहेत. शनिवारी दुपारी किशोर राऊत यांची पत्नी गीता ही आपल्या दोन मुलांना घेऊन होमराज उपासे यांच्या शेतातील विहिरीकडे गेली. त्यानंतर काही वेळानेच दोन्ही मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरली. याबाबत मुलांची आई गीता राऊत हिला पोलीस व नागरिकांनी विचारणा केली असता, आपण दोन्ही मुलासह शेतशिवारात शौचास गेली होती. त्यानंतर लाखोळीची भाजी तोडत असताना दोन्ही मुले विहिरीच्या जवळ खेळत होते. विहिरीला कठडा नसल्याने दोन्ही मुले विहिरीत पडली, असे तिने सांगितले. मात्र गीता राऊत हिनेच घरगुती वादातून मुलांना विहिरीत ढकलल्याची चर्चा गावात आहे. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घरगुती वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती असून, तपासाअंती सत्यता कळेल, असे ठाणेदार संजय सांगळे यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात विहिरीत बुडून दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 8:49 PM
दोन चिमुकल्या भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारच्या सुमारास गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील पोर्ला येथे घडली.
ठळक मुद्देपोर्ला येथील घटना आईसोबत गेले होते शेतात