शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

-अन् मृत्यू स्पर्शून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:38 AM

सकाळी ६.३० वाजताची वेळ असेल...साखरझोपेतून नीट जागही आली नव्हती...मुंबई गाठायला आणखी तासभर उशीर असल्याने जवळपास सर्वच प्रवासी बर्थवर पडून होते...

ठळक मुद्देनागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा अपघात प्रवाशांनी सांगितला थरार : विधात्याचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सकाळी ६.३० वाजताची वेळ असेल...साखरझोपेतून नीट जागही आली नव्हती...मुंबई गाठायला आणखी तासभर उशीर असल्याने जवळपास सर्वच प्रवासी बर्थवर पडून होते...अशा बेसावध क्षणी अचानक जोराचा आवाज झाला...गाडीची लय बिघडली व पाहता पाहता इंजिनसह सात डबे रुळावरून घसरले...वरच्या बर्थचे प्रवासी खाली कोसळले...सामानही अस्ताव्यस्त झाले...काही तरी अघटित घडल्याची जाणीव झाली...सगळे शांत झाल्यावर बाहेर डोकावून पाहिले तेव्हा...काळजात चर्र झाले...प्रत्यक्ष मृत्यू आम्हाला स्पर्शून गेला होता...या प्रतिक्रिया आहेत नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा अपघात अनुभवणाºया नागपूरकर प्रवाशांच्या. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा मंगळवारी सकाळी मुंबईजवळ आसनगाव-वासिंददरम्यान अपघात झाला. या गाडीतील प्रवाशांनी स्वत:ला सुरक्षित असल्याचे पाहून विधात्याचे आभार मानले.पालकमंत्र्यांनी केली गाड्यांची व्यवस्थाअपघात होताच माजी आमदार आशिष जैस्वाल यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. जिल्हाधिकाºयांनी ही माहिती रेल्वे डीआरएमला कळविली व मदतीसाठी नाशिक जिल्हाप्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर जैस्वाल यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. घटनेचा, घटनेनंतरच्या परिस्थितीचा व्हिडिओ व फोटो पाठविले. पालकमंत्र्यांनी लगेच दखल घेत संकटग्रस्त प्रवाशांसाठी गाड्या पाठविण्याची व्यवस्था केली. काही प्रवाशांना या गाड्यांतून नाशिकला सुखरूप पोहोचविण्यात आले. याशिवाय पालकमंत्र्यांनी नागपूर व नाशिक जिल्हाधिकाºयांसह अपघातग्रस्त लोकप्रतिनिधी व प्रवाशांच्या संपर्कात राहून घटनेचा आढावा घेतला.भीषण संकट टळले‘सर्व प्रवासी झोपेत होते. आसनगाव स्टेशनच्या पुढे जोरात झटका बसला. बर्थवरील काही प्रवासी धक्का दिल्यासारखे खाली पडले. एकच आरडाओरड झाली. गाडी अचानक थांबली आणि कुणालाच काही सुचले नाही. काही लोकांनी खिडकीतून बाहेर डोकावले असता गाडीच्या इंजिनला लागून असलेले डबे रुळाखाली घसरले होते. १५ मिनिटातच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची भीषणता लक्षात घेता मोठा घातपात झाल्याचे दिसत होते. परंतु कुणालाही यात मोठी दुखापत झाली नाही. गाडीचा वेग कमी असल्यामुळे प्रवाशांवर आलेले भीषण संकट टळले.’-जस्टीन राव, पत्रकार४९३ प्रवाशांचा जीव आला असता धोक्यातदुरांतोच्या अपघातात या गाडीचे आठ कोच रुळाखाली घसरले. गाडीचा वेग कमी असल्यामुळे या कोचला अपघात झाला नाही नाहीतर ४९३ प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला असता. रुळावरून घसरलेल्या कोचमध्ये एच १ या कोचमध्ये २३ प्रवासी, ए १ या कोचमध्ये ५२, ए २ कोचमध्ये ५२, ए ३ कोचमध्ये ५२, बी १ या कोचमध्ये ७४, बी २ कोचमध्ये ८०, बी ३ कोचमध्ये ८० आणि बी ४ या कोचमध्ये ८० असे एकूण ४९३ प्रवासी होते. रुळावरून घसरून हे कोच न उलटल्यामुळे या प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.मृत्यू जवळून पाहिलासकाळी ६.१५ च्या सुमारास दुरंतोच्या ड्रायव्हरला रुळावर दरड कोसळल्याचे दिसले. त्याने इमरजन्सी ब्रेक मारले. यात गाडीचे इंजिन व सात डबे उलटले. मी ए १ कोचमध्ये ३७ क्रमांकाच्या बर्थवर होतो. सोबत आ. नागो गाणार व माजी खासदार डॉ. खुशाल बोपचेही होते. गाडीचे डबे एकाएक पलटले व आम्ही सर्वच खाली कोसळलो. एकमेकांच्या अंगावर प्रवासी व सामानांचा थर लागला होता. लगेच डब्यातून बाहेर पडलो. प्रवासी एकमेकांच्या मदतीला धावले. आधी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर काही वेळांनी सामान बाहेर काढले. डबे उलटलेल्या ठिकाणी बाजूलाच नदी दुथडी भरून वाहत होती. डबे घसरून नदीत पडले असते तर माझ्यासकट अनेकांना जीव गमवावा लागला असता. कसारा घाटामुळे गाडीचा वेग कमी होता. हा अपघात दुसºया ठिकाणी झाला असता तर नक्कीच मोठी हानी झाली असती. आम्ही आज मृत्यू जवळून पाहिला.- आशिष जैस्वाल, माजी आमदारबालबाल बचावलो‘सकाळी ६.३० वाजता एकदम गाडी थांबली. काय झाले एकदम काहीच कळले नाही. बी-३ कोचच्या बाहेर मोठा चिखल असल्यामुळे बाहेर पडू शकत नव्हतो. लगेच गाडीचा अपघात झाल्याचे समजले. बाहेर येण्यासाठी एसी कोचमधून मागील बाजूला असलेल्या स्लिपर कोचमध्ये गेलो. अडीच किलोमीटर अंतरावरील आसनगावला स्टेशनला पायी गेलो. तेथून हायवे गाठून टॅक्सीने मुंबईला पोहोचलो. ईश्वराच्या कृपेमुळे जीव वाचल्याचा अनुभव आला.’-विक्की मुदलियार, प्रवासीमोठा घातपात टळला‘सकाळी ६.३० वाजतााच्या सुमारास माझी पत्नी बर्थवरून अचानक खाली पडली. कोचमधील प्रवासीही खडबडून जागे झाले. काहीच कळायला मार्ग नव्हता. गाडी थांबली होती. पाच-सहा जण खालून अपघात झाल्याचे ओरडत होते. खाली उतरल्यानंतर गाडीचे इंजिन पलटी झाल्याचे दिसले. एसीचे सर्व कोच रुळावरून घसरले होते. पण त्यात कुणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती. गाडीचा वेग अधिक असता तर मोठा घातपात झाला असता, हे निश्चित.’-अमित रामटेके, पत्रकार