सावनेर/काटोल/कामठी/उमरेड/कळमेश्वर/कुही/मौदा/रामटेक/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. सोमवारी मध्यरात्री आलेल्या अहवालानुसार, ग्रामीण भागात २,४६६ नवीन रुग्णांची भर पडली तर ३९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ग्रामीण भागात बाधितांची एकूण संख्या १,०३,६८९ झाली आहे. यातील ७१,८७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर १७४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काटोल तालुक्यात ५४७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ३२ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. नरखेड तालुक्यात ६९ रुग्णांची नोंद झाली. यात नरखेड शहरातील १८ तर ग्रामीण भागातील ५१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २,३६७ तर शहरात ४८५ झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावअंतर्गत येणाऱ्या गावात (८), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (१७), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (२) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात २४ रुग्णांची भर पडली. रामटेक तालुक्यात १८२ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ४७ व ग्रामीण भागातील १३५ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५,५०९ इतकी झाली आहे. यातील ३,३२५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २,१८४ इतकी आहे.
कुही तालुक्यातील विविध केंद्रांवर ३७२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३,२९२ इतकी झाली आहे. मंगळवारी कुही शहर आणि परिसरात (९), मांढळ (४), वेलतूर (७), साळवा (६) तर तितूर येथे ९ रुग्णांची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यात १०९ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात १९ तर ९० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक हरदोली येथे १६ तर गोंडखैरी येथे १४ रुग्णांची नोंद झाली.
उमरेड तालुक्यात ५७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ५२ तर ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ६५४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मौदा तालुक्यात ३४ रुग्णांची भर पडली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या २,८०८ इतकी झाली आहे. यातील १९०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ८४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हिंगणा तालुक्यात बाधितांची संख्या १० हजारावर
हिंगणा तालुक्यात ८४० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील ४५, कान्होलीबारा व हिंगणा प्रत्येकी (११), इसासनी (८) रायपूर, डिगडोह प्रत्येकी ५, कवडस (४), मोंढा, उखळी, किन्ही धानोली, चिंचोली पठार, नीलडोह व टाकळघाट प्रत्येकी २, सुकळी गुपचूप, देवळी पेंढरी, डिगडोह पांडे, उमरी वाघ, खैरी पन्नासे व गिरोला येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यातील बाधितांची संख्या १०,१०० इतकी झाली आहे. यातील ६,१२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर १९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.