शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नवसंकल्पनेला मार्गस्थ करत नव्या वर्षात पदार्पण : नागपूरकरांनी संयमाने केले वेलकम - २०२१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 10:04 PM

Nagpurkars restrained 'Welcome - 2021'नागपूरकरांनी २०२०च्या सुखद आणि कडू घटनाक्रमांना निरोप दिला आणि त्या घटनांच्या स्मृती जपत २०२१चे स्वागत केले. नव्या वर्षाच्या सूर्योदयासोबतच नागरिकांनी आपापल्या आराध्यांच्या स्थळांना भेटी दिल्या आणि येणारे दिवस सुख, आनंद आणि आरोग्यवर्धक राहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

ठळक मुद्दे उद्याने फुलली, भगवंतचरणी नतमस्तक होऊन सकारात्मकतेचे केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भूतकाळाचा अनुभव घेत, संचित जपत, भविष्याचा वेध घेत वर्तमान जगावे लागते. येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आणि प्रत्येक वर्ष नवे असते आणि नव्याचे स्वागत करताना सकारात्मकता वृद्धिंगत करावी लागते. तोच भाव नागपूरकरांनी २०२०च्या सुखद आणि कडू घटनाक्रमांना निरोप दिला आणि त्या घटनांच्या स्मृती जपत २०२१चे स्वागत केले. नव्या वर्षाच्या सूर्योदयासोबतच नागरिकांनी आपापल्या आराध्यांच्या स्थळांना भेटी दिल्या आणि येणारे दिवस सुख, आनंद आणि आरोग्यवर्धक राहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

सुख वा दु:खे सांगून येत नाहीत. संकेत मात्र देत असतात. संकेत समजता आले नाही तर सुखाचा आनंद घेता येत नाही. दरवर्षीप्रमाणे २०२० हे वर्ष प्रत्येकांसाठीच असेच अनपेक्षित ठरले. सुखापेक्षा संकटाच्या नोंदी मनपटलावर प्रकर्षाने अंकित होतात आणि तेच गतवर्षी झाले. कोरोना नावाच्या सूक्ष्म राक्षसाने प्रवेश केला आणि कधी नव्हे ती धास्ती जगताने अनुभवली. नागपूरही त्याच धास्तीत तब्बल आठ-नऊ महिने होते. मात्र, संकटात जगण्याचे मार्ग नव्या तऱ्हेने सापडतात. प्रदीर्घ काळ घरात राहून, कुटुंबासोबत वेळ घालवून आणि मानवजातीला कोरोनारूपी मिळालेल्या संकटाने भविष्यवेधी पायवा मजबूत करून अंगदाप्रमाणे त्रासदीचा सामना केला. या सगळ्यांतून माग काढत नव्या वर्षात पदार्पण झाले आहे. नव्या वर्षात आत्मबल वाढविण्यासाठी नागरिकांनी देवदर्शन घेेतले. टेकडी गणेश मंदिर, वर्धा रोडवरील साई मंदिर, कोराडीतील जगदंबा महालक्ष्मी मंदिर, आदासा येथील हनुमान मंदिर, आग्याराम देवी मंदिर, महालचे कल्याणेश्वर मंदिर, त्रिमूर्तीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिर आदी मंदिरांमध्ये भाविकांनी पूजा केली. मोठा ताजबाग, छोटा ताजबाग, मोमीनपुऱ्यातील जामा मशिदीमध्येही इबादत करून नववर्षाची सुरुवात करण्यात आली. दीक्षाभूमीवरही बौद्ध अनुयायांनी नववर्षाचे स्वागत करीत अभिवादनासाठी सकाळपासून गर्दी केली होती. बुद्धविहारांमध्येही वंदना करण्यात आली. रामदासपेठ व कामठी रोडवरील गुरुद्वारांमध्ये शीख बांधवांनी माथा टेकला. ख्रिश्चन बांधवांनीही शहरातील प्रमुख चर्चेसमध्ये प्रार्थना करीत नववर्षाची सुरुवात केली. सकाळी विविध धार्मिक स्थळी प्रार्थना केल्यानंतर नागरिकांनी उद्यानांची वाट धरली होती. महाराज बाग, अंबाझरीसह शहरातील प्रमुख उद्याने आबालवृद्धांनी भरली होती. नेहमीचे ताणतणाव, कामाची धावपळ विसरून नवीन वर्षाचा पहिला दिवस कुटुंबासमवेत आनंदाने, उत्साहाने साजरा करण्याचा करण्याचा प्रयत्न नागपूरकरांनी केला. एकूणच नागपूरकरांचा नववर्षाचा पहिला दिवस मंगलमय आणि उत्साहात गेल्याचे दिसून आले. संक्रमणाची धास्ती अजूनही कायम असल्याने नव्या वर्षाच्या स्वागताचा अपेक्षेसारखा जल्लोष नागरिकांना करता आला नाही. दरवर्षी गर्दी उसळणारी स्थळे यंदा बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे, म्हणावा नसा जल्लोष कुठेच नव्हता. निर्बंध कठोर असल्याने नागरिकांनीही संयम दाखवत केवळ देवदर्शनालाच प्राधान्य दिले. बागा मात्र फुलल्या. नववर्षाच्या पहिल्या दिवसाला महाराजबागसारखी स्थळे जच्चा-बच्चांनी फुलून निघाली आहेत.

साई मंदिरात उसळली गर्दी

वर्धा महामार्गावरील श्रीसाई मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी उसळली होती. मंदिर व्यवस्थापनाने मंदिराची सजावट अतिशय आकर्षक रीतीने केली होती. फुलांची आरास, रोषणाई आणि मंत्राच्या गजराने वातावरणात सोज्वळता निर्माण झाली होती.

दीक्षाभूमी गजबजली

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच सार्वजनिक स्थळांवर डिस्टन्सिंगचे आवाहन करण्यात आले आहे. दीक्षाभूमी येथेही हे नियम प्रकर्षाने पाळले जात आहेत. नागरिकांनीही हे नियम पाळत दीक्षाभूमीला मोठ्या संख्येने भेट दिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

फुटाळ्यात नीरव शांतता

गर्दी उसळणारे प्रमुख स्थळ म्हणून फुटाळा तलाव ओळखले जाते. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने तरुणाई येथे येत असते. मात्र, यंदा हा परिसर बॅरिकेड्सेनी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे, फुटाळ्यात नीरव शांतता होती.

महाराजबागेत फुलले हास्य

तब्बल नऊ महिने बंद असलेले महाराजबाग काहीच दिवसांपासून नागरिकांसाठी उघडण्यात आले आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने कुटुंबे अवतरली होते. मुलांच्या खेळण्यावर मोठेही आपल्या बालपणाच्या स्मृती जागवत असल्याचे दिसून येते. इतर बागांमध्येही अशीच स्थिती दिसत होती. शहरातील बरेच बगिचे अजूनही नागरिकांसाठी उघडण्यात आले नाहीत, हे विशेष.

टॅग्स :New Yearनववर्षnagpurनागपूर