लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संबंधाने प्रभावीपणे तपास करण्यासाठी सहा महिन्यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) विकेेंद्रीकरण करण्यात आले आहे. अवघ्या सहा महिन्यात एसआयटीकडे आलेल्या १६७० तक्रारींपैकी ७०० तक्रारींचा निपटारा केला असून, ६८४ पीडितांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिल्याचा दावा एसआयटीच्या कामकाजाची माहिती देताना गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी मंगळवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एसआयटीचे सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे उपस्थित होते.
भूमाफिया ग्वालबन्सीच्या पापाची तक्रार मिळाल्यानंतर त्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेत पोलीस आयुक्तांनी २७ एप्रिल २०१७ ला एसआयटीची स्थापना केली. सहपोलीस आयुक्तांच्या देखरेखीत गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली एसआयटीचे कामकाज सुरू होते. तपास पथकाकडे अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तक्रारी आल्या. एकूण ३५ मोठ्या प्रकरणांपैकी १७ प्रकरणं एकट्या ग्वालबन्सी कंपूविरुद्ध होती. एका प्रकरणात पोलिसांनी दिलीप आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आणि दुसºया एका प्रकरणात पोलिसांनी कुख्यात जर्मन-जापान गुंडांच्या टोळीविरुद्ध मोक्काची कारवाई केली. तातडीने न्याय मिळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे एसआयटीकडे तक्रार करणारांची वर्दळ वाढली. अवघ्या सहा महिन्यात तब्बल १६७० तक्रारी एसआयटीला मिळाल्याने तपासाच्या गतीवर फरक पडला. दरम्यान, आता मोठ्या गुन्ह्यांच्या तक्रारीची संख्या रोडावल्यामुळे आणि प्रलंबित प्रकरणाच्या तपासाला गती मिळावी म्हणून पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम,अनेकांना लाभ, राजकीय दडपण नाहीएसआयटीकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आक्रमक कारवाईचा पवित्रा घेत १८२ एकर जमीन आणि १ कोटी ९२ लाख ८० हजारांची भरपाई पीडितांना मिळवून दिली आहे. एकट्या ग्वालबन्सी कंपूकडून ९८ एकर जमीन ताब्यात घेण्यात आल्याचे उपायुक्त कदम यांनी सांगितले. अनेक प्रकरणांत गुन्हेगारांसोबत काही नेतेही गुंतले आहेत. त्यांच्या दबावामुळे एसआयटीचे विकेंद्रीकरण करण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित झाला असता, कदम यांनी तो फेटाळून लावला. कुणाचा अन् कसल्याही प्रकारचा पोलिसांवर दबाव नसल्याचे ते म्हणाले. अधिक जलदगतीने प्रकरणाचा तपास व्हावा म्हणून विकेंद्रीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अप्पू वाधवानी, जगदीश ग्वालबन्सी यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केलेली नाही, याकडे एका पत्रकाराने लक्ष वेधले असता, योग्य ती कारवाई सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले.