शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आता ५ ऑक्टोबरला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 12:20 AM

Mahavitran,employees, strike, Nagpur News एसएनडीएलमधून महावितरणमध्ये आलेल्या ३५० कर्मचाऱ्यांनी दुपारी ४ वाजता सामूहिक संपावर जाण्याचा इशारा दिल्याने वीज वितरण व्यवस्था डगमगली होती. परंतु रात्री ९ वाजता आंदोलन ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देकाही तासातच निवळला सामूहिक संप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसएनडीएलमधून महावितरणमध्ये आलेल्या ३५० कर्मचाऱ्यांनी दुपारी ४ वाजता सामूहिक संपावर जाण्याचा इशारा दिल्याने वीज वितरण व्यवस्था डगमगली होती. परंतु रात्री ९ वाजता आंदोलन ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४० कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीतून काढण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी सामूहिक संपाचा निर्णय घेतला होता. हा संप जर कायम राहिला असता तर महावितरणला पुरवठा सुरळीत ठेवणे अवघड झाले असते.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एसएनडीएलची सेवा बरखास्त करून शहरातील ३ डिव्हिजन महाल, गांधीबाग व सिव्हिल लाईन्सचे कामकाज महावितरणने सांभाळले. एसएनडीएलचे ऑपरेटर, लाईनमन यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कायम ठेवले. आता महावितरण त्यांच्या जागी परमनंट कर्मचाºयांना त्यांच्या जागी नियुक्त करीत आहे. जवळपास ४० ऑपरेटर व लाईनमनला काढण्यात आले आहे.एसएनडीएलच्या या कर्मचाऱ्यांनी आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या बॅनरखाली अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून दुपारी ४ वाजता सामूहिक संपावर जात असल्याची माहिती दिली. झोन सचिव नितीन शेंद्रे यांनी पत्रात स्पष्ट लिहिले की, शहरातील विजेचे संकट टाळण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा महावितरणमध्ये समावेश करण्यात यावा. महावितरणने एका वर्षातच या कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कर्मचाऱ्यांनी ऊर्जामंत्री व मुख्य अभियंता यांना पत्र लिहिले आहे. परंतु कु णीच दखल घेतली नाही. हे कर्मचारी अनेक वर्षापासून शहरातील सब स्टेशन बरोबरच वितरण प्रणालीची जबाबदारी सांभाळत आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी संपावर गेल्यास वीज वितरण व्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे.अडचण होऊ देणार नाही - महावितरणमहावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके म्हणाले की कंपनी नागरिकांना कुठलीही समस्या होऊ देणार नाही. फिल्डवर कंपनीचे २०० ऑपरेटर, लाईनमन तैनात आहेत. अन्य कर्मचाऱ्यांना जॉईन करायचे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अडचण राहणार नाही.

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारीStrikeसंप