शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

गावकारभाऱ्यांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:07 AM

महाविकास आघाडी समर्थित व भाजप समर्थित पॅनलची प्रतिष्ठा पणाला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज, सोमवारी ...

महाविकास आघाडी समर्थित व भाजप समर्थित पॅनलची प्रतिष्ठा पणाला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत गावकारभारी कोण याचे चित्र स्पष्ट होईल. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजपसमर्थित पॅनल अशी लढत झाली आहे. राज्यातील महााविकास आघाडीमध्ये जिल्ह्यातील दोन वजनदार मंत्री आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्ह्यात एकूण १३० नियोजित ग्रामपंचायतींपैकी सोनपूर (कळमेश्वर) व जटामखोरा (सावनेर) या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबत कुही तालुक्यातील देवळी कला ग्रामपंचायतीची निवडणूक मतदार यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे १२७ ग्रामपंचायतींच्या १,०८६ जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. यात एकूण ३,०१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांपैकी कोण गावाचा कारभार पाहणार, हे आज, सोमवारी स्पष्ट होईल.

------------

येथे होईल मतमोजणी

तालुका : नागपूर (ग्रामीण)

स्थळ : तहसील कार्यालय, नागपूर

एकूण कर्मचारी : २०

एकूण टेबल : १०

----

तालुका : हिंगणा

स्थळ : तहसील कार्यालय, हिंगणा

एकूण कर्मचारी : ४२

एकूण टेबल : ०६

---------------

तालुका :काटोल

स्थळ : तहसील कार्यालय, काटोल

एकूण कर्मचारी : ६

एकूण टेबल : ३

.............................

तालुका : नरखेड

स्थळ : पंचायत समिती सभागृह, नरखेड

एकूण कर्मचारी : ४०

एकूण टेबल : ६

................................

तालुका : सावनेर

स्थळ : तहसील कार्यालय, सावनेर

एकूण कर्मचारी : ७०

एकूण टेबल : १०

.......................................

तालुका : कळमेश्वर

स्थळ : तहसील कार्यालय, कळमेश्वर

एकूण कर्मचारी : ५०

एकूण टेबल : ३

...................................

तालुका : रामटेक

स्थळ : तहसील कार्यालय, रामटेक

एकूण कर्मचारी : १०

एकूण टेबल : ५

.....................

तालुका : पारशिवनी

स्थळ : तहसील कार्यालय, पारशिवनी

एकूण कर्मचारी : ५५

एकूण टेबल : ६

.............................................

तालुका : मौदा

स्थळ : तहसील कार्यालय, मौदा

एकूण कर्मचारी : ४०

एकूण टेबल : ६

..................................

तालुका : कामठी

स्थळ : तहसील कार्यालय, कामठी

एकूण कर्मचारी : ५०

एकूण टेबल : ०७

.....................................

तालुका : उमरेड

स्थळ : तहसील कार्यालय, उमरेड

एकूण कर्मचारी : ५०

एकूण टेबल : ६

.......................

तालुका : भिवापूर

स्थळ : तहसील कार्यालय, भिवापूर

एकूण कर्मचारी : ३

एकूण टेबल : ६

.................................

तालुका : कुही

स्थळ : तहसील कार्यालय, कुही

एकूण कर्मचारी : ४०

एकूण टेबल : ०९

..................................................................