नागपूरकरांच्या भावना : फाशी कायम ठेवण्याच्या निर्णयाचे केले स्वागतनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे युग चांडकच्या मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याच्या निर्णयाचे नागपूरकरांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे न्यायपालिकेवरील नागरिकांचा विश्वास आणखी वाढला असल्याचे मत महिला वर्गाने व्यक्त केले आहे. ‘लोकमत’ने या निर्णयानंतर महिलांच्या भावना जाणून घेतल्या.न्यायालयाकडून हीच अपेक्षा होतीन्यायालयाकडून अशाच निर्णयाची अपेक्षा होती. युग चांडक प्रकरणात फाशीची शिक्षा कायम ठेवल्यामुळे न्यायव्यवस्थेवरील समाजाचा विश्वास आणखी वाढला आहे, हे निश्चित.- नीलिमा गढीकर, माजी नगरसेविका
सकारात्मक संदेशउच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. या निर्णयामुळे महिलांच्या मनातील भीती संपली आहे. या निर्णयाचे नक्कीच चांगले परिणाम होणार आहेत. गुन्हे करण्याची कोणी हिंमत करणार नाही.- नाजरा पटेल, शिक्षिका
प्रशंसनीय निर्णयउच्च न्यायालयाने या निर्णयाच्या माध्यमातून आपली चिंतादेखील व्यक्त केली आहे. न्यायालयाने युग प्रकरणानंतरची स्थिती लक्षात घेतली हे देखील महत्त्वाचे आहे. न्यायालयाचा हा निर्णय समाधानकारक व प्रशंसनीय आहे.- सुशीला सिन्हा, गृहिणी
गुन्हेगारांना फाशीच हवीअशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी. उच्च न्यायालयाने गुन्हेगारांची फाशीची शिक्षा कायम ठेवून युगच्या कुटुंबीयांसोबतच समाजाला न्याय दिला आहे.- साक्षी शर्मा, गृहिणी
महिलांना आनंदयुग चांडकच्या मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवून न्यायालयाने गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकविला आहे. या प्रकरणानंतर महिलांमध्ये मुलांची चिंता वाढली होती. परंतु त्यांना या निर्णयामुळे सर्वात जास्त आनंद झाला आहे.- इकरा खान, समाजसेविका
समाधानकारक निर्णयउच्च न्यायालयाने खूपच चांगला निर्णय दिला आहे. यामुळे सर्वांनाच समाधान लाभले आहे. मारेकऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे.- निशा बोरकर, गृहिणी