नागपूर : महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात सहभागी आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या मागण्या मांडल्या. मोर्चातील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री उदय सामंत यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी निवेदनातील मागण्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
नेतृत्व : रंगा राचुरे, धनंजय शिंदे, देवेंद्र वानखेडे
मागण्या :
-राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या
-पीक विमा कंपनीला सरसकट पीक विमा देणे बंधनकारक करावे
-शेतमजुरांना रोहयो अंतर्गत काम द्यावे
-उसाची एफआरपी वाढवून ठरविलेली एफआरपी एकरकमी देण्याचा जीआर काढावा
-कापसाला प्रती क्विंटल १० हजार भाव देऊन निर्यात वाढवावी
-शेतीला दिवसा १२ तास वीज पुरवठा करून थकीत बिल माफ करावे
...........