शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

कळमन्यात चाकूच्या धाकावर दरोडा : सहापैकी पाच आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:32 PM

चाकूच्या धाकावर दरोडा घालून एका व्यक्तीला गंभीर जखमी करणाऱ्या पाच दरोडेखोरांना कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाचमध्ये दोन अल्पवयीन आहेत. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी फरार आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.

ठळक मुद्देदोन अल्पवयीनांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चाकूच्या धाकावर दरोडा घालून एका व्यक्तीला गंभीर जखमी करणाऱ्या पाच दरोडेखोरांना कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाचमध्ये दोन अल्पवयीन आहेत. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी फरार आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली.जुना कामठी मार्गावर झाडे ले-आऊट आहे. विरळ वस्तीच्या या भागात अशोक पटले, लता रंगलाल पटले आणि शेख सलीम शेख चांदमिया हे आजूबाजूला राहतात. ५ जुलैला रात्री तीन ते चार आरोपी पटलेच्या घरासमोर आले. त्यांनी तेथून पटलेच्या पाळीव श्वानाचे पिल्लू उचलले. ते चोरून नेत असल्याचे लक्षात आल्याने पटले यांनी आरोपींना हटकले. त्यावरून आरोपींनी पटलेंसोबत वाद घालून त्यांना बेदम मारहाण केली आणि पळून गेले. पटले यांनी या घटनेची तक्रार कळमना ठाण्यात नोंदवली असता पोलिसांनी त्याची अदखलपात्र अशी नोंद करून पटलेंना एनसीची पावती दिली.९ जुलैला रात्री ९ च्या सुमारास सहा आरोपी पुन्हा याच भागात आले. यावेळी लता नागपुरे आणि शेख सलीम यांना आरोपींनी पटलेचे घर कोणते आहे, अशी विचारणा केली. या दोघांनी माहीत नाही म्हटल्यामुळे ते संतप्त झाले. त्यावेळी ते तेथून निघून गेले. त्यांनी पटलेचे घर शोधले. आरोपींनी त्यांच्या घरातून टीव्ही, कुलर चोरला आणि अन्य साहित्याची तोडफोड केली. नंतर ते लता नागपूरेंच्या घरी शिरले. त्यांनी घरात असलेल्या लता तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून लता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि त्यांच्या पतीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपी सलीम शेख यांच्या घरात शिरले. त्यांनाही चाकूच्या धाकावर रोख आणि मौल्यवान चिजवस्तूंची मागणी केली. सलीम यांनी विरोध केला असता आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर चाकूने हातावर मारून त्यांच्याकडून ६ हजार रुपये तसेच मोबाईल हिसकावून घेतले. आरोपी पळून गेल्यानंतर लता नागपूरे आणि सलीम यांनी कळमना ठाण्यात धाव घेतली. लुटमारीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.खबऱ्याने दिली टीपज्या भागात हा गुन्हा घडला. त्या भागात रेल्वेलाईन आहे. तेथून एका खबºयाने आरोपींविषयी माहिती कळविली. त्यावरून पोलिसांनी कळमना गावातून गौरव उर्फ दद्दू अनिल उईके (वय १८, रा. समतानगर, नारी), रासकिन आणि सागर या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी खापरखेडा परिसरातील एका बारमधून ललित ऊर्फ पीयूष सुरेश मुळे (वय १८, रा. राजलक्ष्मीनगर, कळमना)आणि आसिफ या दोघांना ताब्यात घेतले. त्यांचा मिखल नामक एक साथीदार फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कळमन्याचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण, उपनिरीक्षक अमितकुमार आत्राम, पी. डी. बांबोळे, हवालदार छगन राऊत, राजेश तिवारी, नायक राजेश नाईक, मनोज बहुरूपी यांनी ही कारवाई केल्याचे पोलीस उपायुक्त पोद्दार यांनी सांगितले.एमपीडीए किंवा मोक्काची कारवाईया गुन्ह्यातील आरोपींचा पोलिसांनी क्राईम रेकॉर्ड काढला असता ते सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी गौरवसह बहुतांश गुन्हेगारांना दारूचे व्यसन आहे. ते भागविण्यासाठीच हे गुन्हेगारी करीत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला. आरोपी गौरव ऊर्फ दद्दूवर ५, पियूषवर ३ आणि आसिफवरही एक गुन्हा असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर एमपीडीए किंवा मोक्कासारखी कारवाई करता येईल का, त्याचा विचार करीत असल्याचेही उपायुक्त पोद्दार यांनी सांगितले.

टॅग्स :RobberyचोरीArrestअटक