लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अॅनिमिया, वाढलेला रक्तदाब, अतिरक्तस्त्राव, पोटातील बाळाची अव्यवस्थित वाढ, कमी झालेली प्लेटलेटची संख्या व गर्भावस्थेतील मधुमेह ही अति जोखमी मातांची लक्षणे आहेत. ही लक्षणे ओळखून तातडीने उपचार होत असल्याने माता मृत्यूची संख्या कमी झाली आहे. सध्या अॅनिमिया, उच्च रक्तदाब व गर्भावस्थेतील मधुमेह हे जोखमीच्या मातांमध्ये मुख्य कारण दिसून येत आहे, अशी माहिती नागपूर आॅब्स्टेस्ट्रीक अॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीच्या (एनओजीएस) अध्यक्षा डॉ. कांचन सोरटे यांनी दिली.नागपूर आॅब्स्टेस्ट्रीक अॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीच्या (एनओजीएस) वतीने २७ ते २९ जुलैपर्यंत ‘फॉग्सी जेस्टोसिस-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी ‘फॉग्सी’च्या सचिव डॉ. सुषमा देशमुख, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. अल्का मुखर्जी, डॉ. वैदेही मराठे आदी उपस्थित होत्या.डॉ. देशमुख म्हणाल्या,महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत ६१ मातामृत्यू होतात. तर केरळमध्ये एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत ४६ मातामृत्यू होतात. मातामृत्यू रोखण्यासाठी प्रसूती व स्त्रीरोग संघटनेने पुढाकार घेतला आहे. त्याचे एक पाऊल म्हणजे ‘फॉग्सी जेस्टोसिस’ परिषदचे आयोजन. यात देशी व विदेशी तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. डॉ. पॅट्रीक ओब्रायन व डॉ. संजय गुप्ते हे व्याख्यानमालेत बोलणार आहेत.धोकादायक प्रसूतीवर जनजागृतीडॉ. अल्का मुखर्जी म्हणाल्या, धोकादायक प्रसूतीवर २६ जुलै रोजी मातृसेवा संघ येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार उपस्थित राहतील. यावेळी मोफत रक्तलोह चाचणी, आहाराचा सल्ला यावरही मार्गदर्शन केले जाईल.आॅब्स्टेस्ट्रीक आयसीयूची भूमिका महत्त्वाचीडॉ. चैतन्य शेंबेकर म्हणाले, मातामृत्यू रोखण्यासाठी ‘आॅब्स्टेस्ट्रीक आयसीयू’ची भूमिका महत्त्वाची ठरते. परंतु मोजके मोठे खासगी रुग्णालये सोडल्यास अनेक रुग्णालयात या ‘आयसीयू’ची सोय नाही. काही रुग्णालयांमध्ये ‘हाय डीपेंडेन्सी युनिट’ (एचडीयु) आहे. याचीही बरीच मदत होते.
जोखमीच्या मातांवरील उपचाराने मृत्यू दरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:55 PM
अॅनिमिया, वाढलेला रक्तदाब, अतिरक्तस्त्राव, पोटातील बाळाची अव्यवस्थित वाढ, कमी झालेली प्लेटलेटची संख्या व गर्भावस्थेतील मधुमेह ही अति जोखमी मातांची लक्षणे आहेत. ही लक्षणे ओळखून तातडीने उपचार होत असल्याने माता मृत्यूची संख्या कमी झाली आहे. सध्या अॅनिमिया, उच्च रक्तदाब व गर्भावस्थेतील मधुमेह हे जोखमीच्या मातांमध्ये मुख्य कारण दिसून येत आहे, अशी माहिती नागपूर आॅब्स्टेस्ट्रीक अॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीच्या (एनओजीएस) अध्यक्षा डॉ. कांचन सोरटे यांनी दिली.
ठळक मुद्देकांचन सोरटे : ‘फॉग्सी जेस्टोसिस’ परिषद २७पासून