खासगी डॉक्टरांनी आकस्मिक सेवा देऊन जपली माणुसकीनागपूर : सुरक्षेचा मुद्दा रेटून धरणाऱ्या मेयो, मेडिकलच्या ४१० निवासी डॉक्टरांवर बुधवारी निलंबनाची कारवाई झाली असताना गुरुवारी या डॉक्टरांनी रक्तदान करून शासनाला सामाजिक भान ठेवण्याचे संकेत दिले. खासगी डॉक्टरांनी या निवासी डॉक्टरांना पाठिंबा देत संपात उडी घेतली. रुग्णालयांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवले, मात्र आकस्मिक सेवा सुरू ठेवून माणुसकीही जपली. सोमवारपासून सामूहिक रजेवर गेलेल्या निवासी डॉक्टरांवर एवढ्या मोठ्या संख्येत निलंबनाची कारवाई झाल्याने सर्वत्र संतापाचे पडसाद उमटत आहे. नेते, अभिनेत्यांना सुरक्षा दिली जाते, परंतु २४ तास रुग्णांच्या सेवेत असणाऱ्यांना, त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना योग्य सुरक्षा दिली जात नाही. यातच शासकीय रुग्णालयातील गैरसोयींवर चिडून रुग्णाचे नातेवाईक लक्ष्य करतात. मारहाण करतात. परंतु वाचविण्यासाठी कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षकही धावून येत नाही. वाढत्या हल्ल्याच्या घटनांमुळे रुग्णालयात काम करताना असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र १२ तासांच्या आत सुरक्षा न देता थेट निलंबनाचे आदेश काढले हे न पटणारे आहे, असे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे. या विरोधात बुधवारी रात्री उशिरापर्यंत अधिष्ठाता कार्यालयासमोर निवासी डॉक्टरांनी धरणे दिली, तर गुरुवारी सकाळी रक्तदान करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.निवासी डॉक्टरांवरील निलंबनाची कारवाई चुकीची आहे. ती मागे घेण्यासाठी व डॉक्टरांच्या संरक्षण कायद्याची कठोरतने अंमलबजावणी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बुधवारपासून संपात उडी घेतली. याला विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन‘आयएमए’ने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. सोबतच डॉक्टरांच्या सुरक्षेला घेऊन चर्चा केली. यात पोलिसांची कार्यशाळा घेऊन डॉक्टरांच्या संरक्षण कायद्याची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच रुग्णालयांच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याचे व दर तीन महिन्यातून एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश वासे, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य डॉ. अनिल लद्धड, डॉ. मिलिंद नाईक व डॉ. प्रकाश देव उपस्थित होते. ६५० दंत डॉक्टरांची संपात उडीइंडियन डेंटल असोसिएशनचे सचिव डॉ. वैभव कारेमोरे यांनी सांगितले, निवासी डॉक्टरांच्या निलंबनाला विरोध व आयएमएच्या संपाला पाठिंबा देत गुरुवारी सायंकाळी असोसिएशनचे ६५० डॉक्टरही या संपात सहभागी झाले आहेत. नागपुरातील सर्वच खासगी दंत रुग्णालये मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद राहील, असेही ते म्हणाले.
धरणे, रक्तदान करून वेधले लक्ष
By admin | Published: March 24, 2017 2:35 AM