शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दीपक बजाजविरुद्ध आरोप निश्चित

By admin | Published: July 27, 2016 2:42 AM

कोट्यवधीच्या अपसंपदेप्रकरणी जरीपटका येथील महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. दीपक खुबचंद बजाज

कोट्यवधीच्या अपसंपदेचे प्रकरण : पुन्हा जामीन अर्ज दाखल नागपूर : कोट्यवधीच्या अपसंपदेप्रकरणी जरीपटका येथील महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. दीपक खुबचंद बजाज आणि त्यांची पत्नी वीणा बजाज यांच्याविरुद्ध मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. सध्या न्यायालयीन कोठडीत कारागृहात असलेले बजाज यांनी पुन्हा जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. २४ सप्टेंबर २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड घातली असता दीपक बजाज यांचे साईकृपा प्रिन्सिपाल बंगलो नावाचे निवासस्थान, शाळा कार्यालय, सोसायटी कार्यालय आणि इतर परिसराच्या झडतीत १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख आणि २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किमतीचे घरगुती सामान, अशी एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किमतीची स्थावर व जंगम मालमत्ता आढळून आली होती. २६ सप्टेंबर २०१५ रोजी जरीपटका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई), १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९ सप्टेंबर रोजी पुन्हा सिंधु एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय, सिंधु एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय तसेच कार्यालय परिसरातील प्रिंटिंग प्रेसचे पुरावे गोळा करण्याच्या हेतूने झडती घेतली असता, पतसंस्थेच्या गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती. दीपक बजाज यांना १२ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. २६ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली. तेव्हापासून ते कारागृहात आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास पूर्ण करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई), १३(२), भादंविच्या ३४, १२० (ब), १६८, १९३, २०१, ४०६, ४०९, ४२०, ४६८, ४६७, ४७१ कलमांतर्गत दीपक बजाज आणि त्यांच्या पत्नी वीणा दीपक बजाज यांच्याविरुद्ध ८ फेब्रुवारी २०१६ रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील गिरीश दुबे आणि आरोपीच्यावतीने अ‍ॅड. रजनीश व्यास काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)