लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मंगळवारी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ईईएल (इकॉनॉमिक एक्स्पोसिव्ह लिमिटेड), डीआरडीओ प्रयोगशाळा व वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडला भेट देतील. ईईएल येथील भेटीदरम्यान संरक्षणमंत्री भारतीय सैन्यदलाला मेड इन इंडिया मल्टिमोड ग्रेनेड्स प्रदान करतील. हे ग्रेनेड्स डीआरडीओ व टर्मिनल बॅलेस्टिक रिसर्च लॅबोरेटरीने विकसित केले होते व १० लाख ग्रेनेड्सच्या उत्पादनाचे कंत्राट ईईएलकडे देण्यात आले होते.
नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर राजनाथ सिंग ईईएलला भेट देतील. त्यानंतर ते डीआरडीओच्या प्रयोगशाळेची पाहणी करतील. सोबतच वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडला ते भेट देणार आहेत. दुपारच्या सुमारास त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. राजनाथ सिंग हे आज, मंगळवारी पुणे येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या जवानांचादेखील सत्कार करतील. अगोदर संबंधित कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी होणार होता. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे तो २४ तारखेला पुनर्नियोजित करण्यात आला.