लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. रुळावर दीड फूट पाणी साचले. यामुळे तेलंगणा एक्स्प्रेससह बहुतांश रेल्वेगाड्यांना आऊटरवर रोखून धरण्यात आले. पावसामुळे शुक्रवारी तब्बल १४रेल्वेगाड्यांना २ ते ११ तास विलंब झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर रेल्वेस्थानकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यात रेल्वे रुळावर दीड फूट पाणी आल्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांना आऊटरवर रोखून धरण्यात आले. यात दक्षिण एक्स्प्रेस रुळावर पाणी आल्यामुळे अर्धी गाडी रुळावर तर अर्धी गाडी प्लॅटफॉर्मच्या बाहेर उभी करण्यात आली होती. तेलंगणा एक्स्प्रेसलाही १० मिनिटे आऊटरवर रोखून धरण्यात आले. तर १४ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. यात रेल्वेगाडी क्रमांक १२२६१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा दुरांतो एक्स्प्रेस १० तास, १५०२४ यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेस ११ तास, १२५११ गोरखपूर-त्रिवेंद्रम राप्तीसागर एक्स्प्रेस ६ तास, १२८३३ अहमदाबाद-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस ५ तास, १२५१२ तिरुअनंतपुरम-गोरखपूर राप्तीसागर एक्स्प्रेस ८.१० तास, १५०१६ यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेस २ तास, १२१५१ लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्स्प्रेस ४ तास, १२९७५ म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेस १ तास, १२१३५ पुणे-नागपूर एक्स्प्रेस १.५० तास, १८०३० शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १.३५ तास, १२८४४ अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस ३.१५ तास, २२८८६ टाटानगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २ तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस २.३० तास, २२६८४ लखनौ-यशवंतपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस २.१५ तास या गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहावे लागले.रेल्वेस्थानक परिसर पाण्यातपावसामुळे रेल्वेस्थानकाचा संपूर्ण परिसर पाण्यात बुडाल्याचे चित्र होते. आरक्षण कार्यालयात छत टपकत असल्यामुळे या कार्यालयाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. बहुतांश प्लॅटफॉर्मवर छत टपकत असल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासही जागा नसल्याचे चित्र दृष्टीस पडले. रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागातील समोरच्या रस्त्यावर दोन फूट पाणी जमा झाल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागली. तर रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्याचे छतही टपकत असल्यामुळे जवानांना तशाच परिस्थितीत ड्युटी बजावण्याची पाळी आली.
नागपुरात पावसामुळे १४ रेल्वेगाड्यांना विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 9:33 PM
उपराजधानीत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. रुळावर दीड फूट पाणी साचले. यामुळे तेलंगणा एक्स्प्रेससह बहुतांश रेल्वेगाड्यांना आऊटरवर रोखून धरण्यात आले. पावसामुळे शुक्रवारी तब्बल १४रेल्वेगाड्यांना २ ते ११ तास विलंब झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
ठळक मुद्देरेल्वे रुळावर दीड फूट पाणी : तेलंगणा एक्स्प्रेससह इतर गाड्यांना आऊटरवर रोखले