शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

कोसळलेल्या स्लॅबचा मलबा हटविला

By admin | Published: January 17, 2016 2:55 AM

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची स्लॅब कोसळून त्यात ठेकेदाराचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले.

कुणीही आढळले नाही : तिघांवर गुन्हे दाखलमौदा : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची स्लॅब कोसळून त्यात ठेकेदाराचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. त्यानंतर स्लॅब हटविण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चालले. शनिवारी दुपारपर्यंत स्लॅबचा मलबा तेथून पूर्णत: हटविला. मात्र त्या मलब्यात काहीही आढळले नाही. त्यामुळे मलब्याखाली आणखी काही दबले असल्याची शक्यता मावळली. दरम्यान, स्लॅबखाली दबल्याने मृत्यू झालेल्या ठेकेदाराच्या पार्थिवावर शनिवारी मांगली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मौदा पोलिसांनी घरमालकासह कंत्राटदार आणि अभियंत्यावर गुन्हा दाखल केला आहे. मौदा-रामटेक मार्गावर डॉ. अनिल बोरकर यांच्या मालकीच्या जागेत मंगल कार्यालय इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथे शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास स्लॅब टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना स्लॅब कोसळले. या घटनेत २२ जण जखमी झाले. तर मलब्याखाली काही मजूर दबून असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे मलबा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, रात्री १०.३० वाजताच्या सुमारास इमारत बांधकामाचा ठेकेदार दिनकर डोरले (५०, रा. तेलीमांगली) याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेत जखमी झालेल्यांपैकी १७ मजुरांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून मेडिकलमध्ये पाठविले. तेथे त्यांच्यावर उपचार करून १६ मजुरांना सुटी देण्यात आली. सध्या वॉर्ड क्र. ७ मध्ये एक मजूर भरती असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी घरमालक डॉ. अनिल गजानन बोरकर (४३, रा. मौदा), मृत ठेकेदार दिनकर डोरले (५०, रा. तेलीमांगली) आणि अभियंता अमितोष देवीकार (३५, रा. सुंदरनगर, रायपूर छत्तीसगड) या तिघांविरुद्ध भादंविच्या कलम ३०४, ३०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास मौदा पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)मलब्यात दबूनही केला होता फोनही घटना घडताच मलब्याखाली दबल्या गेलेले दिनकर डोरले यांनी मलब्याखाली आपल्यासह दोन मजूर दबून असल्याबाबत त्यांच्या मोबाईलद्वारे त्यांच्या आप्तस्वकीयांना सूचित केले होते. त्यामुळे दिनकर हे मलब्याखाली दबले असले तरी सुरक्षित असल्याची सर्वांना खात्री झाली होती. मात्र रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मलब्याखालून बसलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेहच बाहेर निघाला.