लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली विमानतळावर चार दिवसांपूर्वी दिल्लीहून नागपूरकडे टेकआॅफ करणाऱ्या विमानाच्या वेळीच अन्य विमानाला धावपट्टीवर लॅन्डिंग करण्यास परवानगी देण्याच्या प्रकरणात एक प्रवासी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहे. गुरमित सिंह असे नागपुरातील प्रवाशाचे नाव आहे.२९ आॅगस्टला इंडिगो एअरलाईन्सचे दिल्ली-नागपूर विमान ६ई२२१ मध्ये १६० प्रवासी होते. हे विमान सायंकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी टेकआॅफ करीत होते. विमान धावपट्टीवर १०० कि़मी. वेगाने पुढे जात होते. पण याचवेळी एक विमान समोरून धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत आकाशात दिसले. त्याचवेळी इंडिगो विमानाच्या पायलटने बे्रक लावून त्वरेने धावपट्टीवरून हटवून टॅक्सी-वेकडे वळविले. इंडिगोच्या पायलटच्या दक्षतेमुळे अपघात टळला. घटनेमुळे विमान नागपुरात रात्री ९.४० वाजता पोहोचण्याऐवजी दिल्लीहून रात्री १०.३० निघाले आणि रात्री १२ वाजता नागपुरात पोहोचले. या घटनेनंतर प्रवाशांनी पायलटसोबत झालेली चर्चा रेकॉर्डिंग केली आहे.
या प्रकरणात एटीसीने दिलेले निर्देश चुकीचे असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहे. यात बेजबाबदारपणा दिसून येतो. घटनेनंतर पायलटसोबत झालेली चर्चा रेकॉर्डिंग केली आहे. दुर्घटना टाळण्यासाठी पायलटचा सत्कार केला पाहिजे.गुरमित सिंह, सदस्य,ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आॅफ इंडिया.