शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दिल्लीच्या ठगबाजाची केंद्र सरकारकडून कंत्राट मिळवून देण्याची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 9:29 PM

केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांतर्गत लाखोंच्या कामाचे कंत्राट देण्याची थाप मारून दिल्लीच्या ठगबाजांनी एका स्थानिक व्यापाऱ्याला तीन लाखांचा गंडा घातला.

ठळक मुद्देतीन लाख हडपले : गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांतर्गत लाखोंच्या कामाचे कंत्राट देण्याची थाप मारून दिल्लीच्या ठगबाजांनी एका स्थानिक व्यापाऱ्याला तीन लाखांचा गंडा घातला.रवी चंद्रशेखर वेखंडे (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते लक्ष्मीनगरात राहतात. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे कार्यालय आहे. ते कॉम्प्युटर, लॅपटॉपची विक्री आणि सेवा देतात. चार महिन्यांपूर्वी त्यांना आरोपी अंशुमन शास्त्री, प्रिन्स सर्व्हिसेस नवी दिल्ली यांच्याकडून संपर्क करण्यात आला. भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञात विभागात कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सौभाग्य उजाला योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात एलईडी बल्बचा पुरवठा करायचा आहे, अशी माहिती दिली. त्यासंबंधाने लाखोंचे कत्रांट मिळवून देण्याचेही आमिष आरोपीने दाखवले. वेखंडे यांचा विश्वास बसावा म्हणून आरोपीने केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ई-मेल केले. त्यातील मजकूर खरा असल्याचा गैरसमज झाल्याने वेखंडे यांनी आरोपी अंशुमन शास्त्रीने सांगितल्याप्रमाणे त्याला तीन लाख रुपयांचा धनादेश दिला. हे झाल्यानंतर आरोपीने प्रकल्प मिळवून देण्याची बतावणी केली. परंतु नंतर तो टाळाटाळ करू लागला. तब्बल चार महिने त्याने टाळल्याने वेखंडे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशीअंती सोमवारी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजी