शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिकपणे सेवा पोहोचवा - विजयलक्ष्मी बिदरी

By आनंद डेकाटे | Published: October 04, 2023 4:21 PM

प्रशासकीय सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या २५० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

नागपूर : शेवटच्या लोकांपर्यंत प्रशासन पोहोचविण्यासाठी पारदर्शकतेने व प्रामाणिकपणे काम करा, असा सल्ला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी शासनाच्या सेवेत नव्याने राजपत्रित अधिकारी म्हणून रूजू होत असलेल्या विविध विभागातील अधिकाऱ्यांना दिला.

वनामती येथे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे उद्घाटन बिदरी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी वनामतीच्या संचालक मिताली सेठी, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव लीना सांख्ये, कक्ष अधिकारी सुनिल निकम, प्रशिक्षण संचालक सुवर्णा पांडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत राजपत्रित अधिकाऱ्यांसाठीच्या (वर्ग-दोन) नवव्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राला सुरूवात झाली असून याअंतर्गत प्रशासनातील विविध विभागांच्या २५० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण १०४ आठवड्यांचे असून समाजमन व सामाजिक जाणिवा प्रगल्भ करतांनाच गतीमान प्रशासनासाठीच्या विविध विषयाच्या अभ्याससत्राचा समावेश यात करण्यात आला आहे.

प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश करतांना प्रशासन म्हणून लोकांची सेवा करायची आहे. त्या अनुषंगाने शेवटच्या मानसापर्यंत प्रशासन पोहचविण्याची जबाबदारी पूर्ण करायची असल्याचे सांगतांना श्रीमती बिदरी म्हणाल्या, प्रशासनामध्ये प्रामाणिकपणे काम करा, उत्तम सेवा देतांनाच जनतेसाठी सदैव उपलब्ध राहून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य होईल, यासाठी पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून द्या. प्रशासकीय सेवेची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे ही भावना समोर ठेवून काम करण्याचा सल्लाही बिदरी यांनी दिला. प्रास्ताविकात प्रशिक्षण संचालक सुवर्णा पांडे यांनी केले. संचालन प्रा. किशोर वाघमारे यांनी केले तर इंदिरा वाघ यांनी केले.

- महिला अधिकाऱ्यांसाठी नवीन वसतिगृह

प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांसाठी नवीन बांधण्यात आलेल्या ‘वनलता’ या वसतीगृहाचे उद्घाटन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, संचालक मिताली सेठी, प्रशिक्षण संचालक सुवर्णा पांडे, सहायक संचालक डॉ. विद्या मानकर उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकारnagpurनागपूर