शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

२.८० लाख मालमत्ताधारकांना डिमांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:57 AM

सायबरटेकने सर्वेक्षणात घोळ घातल्याने गेल्या वित्त वर्षात मालमत्ताकराच्या डिमांड वाटप करताना महापालिकेला अडचणींचा सामना करावा लागला. याचा कर वसुलीला फटका बसला. यातून धडा घेत महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने मे अखेरीस २.८० लाख डिमांड वाटप करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यातील ५० हजार डिमांडचे झोन कार्यालयांनी वाटप केले आहे. उर्वरित २०१८-१९ या वर्षाच्या डिमांड जूनपर्यंत मिळणार आहे.

ठळक मुद्दे३० जूनपर्यंत मालमत्ताकर भरल्यास सामान्यकरात चार टक्के सूट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायबरटेकने सर्वेक्षणात घोळ घातल्याने गेल्या वित्त वर्षात मालमत्ताकराच्या डिमांड वाटप करताना महापालिकेला अडचणींचा सामना करावा लागला. याचा कर वसुलीला फटका बसला. यातून धडा घेत महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने मे अखेरीस २.८० लाख डिमांड वाटप करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यातील ५० हजार डिमांडचे झोन कार्यालयांनी वाटप केले आहे. उर्वरित २०१८-१९ या वर्षाच्या डिमांड जूनपर्यंत मिळणार आहे.नागपूर शहरात सुमारे ६ लाख मालमत्तांचे सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी सायबरटेक व अन्य कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील ३.९२ लाख मालमत्तांचा डाटा मालमत्ताकर विभागाला प्राप्त झाला आहे. याची पडताळणी केल्यानतंर २.८० लाख मालमत्ताधारकांना डिमांड जारी करण्याचे आदेश अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिले आहे. यासंदर्भात मे महिन्याच्या सुरुवातीलाच बैठक आयोजित करण्यात आली होती.डिमांड मिळताच जूनअखेरीस मालमत्ताकर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्यकरात चार टक्के सूट दिली जाणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करापासून ५०० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्याच्या विचारात आहेत. गेल्या वर्षात मालमत्ता करातून महापालिकेच्या तिजोरीत जेमतेम २२० कोटींचा महसूल जमा झाला. डिमांड वाटपाला विलंब व सर्वेक्षणातील घोळामुळे अपेक्षित करवसुली झाली नाही.गेल्या वर्षातील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिल्लक दोन लाख मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. जुलै-आॅगस्टपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यत सर्व मालमत्ताधारकांना डिमांड वाटप करण्याचा प्रयत्न आहे.४२ हजार मालमत्तांवर सुनावणीसर्वेक्षण व मूल्यांकनाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मालमत्ताकर विभागाने प्रयत्न केले आहे. ४२ हजार मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. २१ दिवसात त्यांना यावर आक्षेप नोंदविता येतील. आलेल्या आक्षेपावर सुनावणी पूर्ण करून सबंधित मालमत्ताधारकांना डिमांड पाठविल्या जातील. मे महिन्यात प्रथमच २.८० लाख डिमांड वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त, मालमत्ताकर विभाग

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर