नागपूर : पंजाबी लाईन गुरुद्वारा येथे अंडरब्रीजचे काम तीन-चार महिन्यापासून सुरू आहे. यामुळे उत्तर नागपूर तसेच कामठी रोडवरील वाहनचालकांना अडचण होत असून, पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीने केली आहे. या पुलाच्या कामासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा एमएसईबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पुलाच्या खाली एमएसईबीचे ११ केव्ही क्षमतेचे केबल आहे. ही लाईन सरकविण्याची विनंती करूनही एमएसईबी सहकार्य करीत नसल्यामुळे पुलाचे काम रखडले आहे. व्हीएनआयटीकडूनही अद्याप स्ट्रक्चर ड्रॉईंग मिळालेले नाही. या पुलाचे काम रखडल्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना त्रास होत असून पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने डीआरएमला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगरसेवक संदीप सहारे, नगरसेविका स्नेहा विवेक निकोसे, नगरसेविका भावना लोणारे, त्रिशरण सहारे, विवेक निकोसे, पंकज लोणारे, प्रशांत उके, ललित डंभारे, सूरज आवळे, पीयूष लाडे, अनमोल लोणारे उपस्थित होते.
............