शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी

By admin | Published: March 20, 2015 1:10 AM

सावली तालुक्यात कोणतेही छोटा मोठा उद्योग नाही. परिणामी या भागातील नागरिकांचे जगणे शेतीच्या उत्पादनावर अवलंबून आहे.

गेवरा: सावली तालुक्यात कोणतेही छोटा मोठा उद्योग नाही. परिणामी या भागातील नागरिकांचे जगणे शेतीच्या उत्पादनावर अवलंबून आहे. शेतीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर मजुरांच्या हाताला जून- जुलैपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम नसल्याने सध्या या तालुक्यातील मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत किमान १०० दिवस प्रत्येकाच्या हाताला काम देण्याची व मागेल त्याला काम देण्याचा कायदा अस्तित्वात असला तरी आजतागायत सावली तालुक्यातील गेवरा परिसरात एखादी ग्रामपंचायत वगळता कोणत्याही ग्रामपंचायत क्षेत्रात रोजगार हमीची कामे सुरु नाहीत. या परिसरात कोरडवाहू शेतीचा पट्टा आहे. बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सोबतच वनाचे क्षेत्र मोठे असून कोणत्याही प्रकारे कृषी किंवा वनविभागाचे तसेच बांधकाम विभाग पंचायत विभाग, अशा कोणत्याही प्रशासनाच्या अख्तारित काम उपलब्ध नाही. त्यामुळे या पंचक्रोशीतील मजूर वर्ग रोजगाराअभावी वैनगंगा पार करुन गडचिरोली शहर तसेच जिल्ह्याबाहेर मजुरी करण्यासाठी स्थलांतरित होत आहे. या भागात साधारणत: जिल्हा परिषद क्षेत्राचा जरी विचार केल्यास अनेक ठिकाणी पूल व कालव्याचे बांधकाम सुरू आहे. ही कामे कुशल व कंत्राटी असल्याने अशा कामांवर मोजकेच मजूर कामे करताना दिसतात. त्यामुळे श्रमाचे काम करणाऱ्या मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा प्रदान होत नाही. याचे खरे कारण म्हणजे मजुरांची नोंदणी कुठेही झालेली दिसत नाही. महाराष्ट्र शासनाच्या इमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी अधिनियम १९९६ च्या कलम ६२ पोट कलम १२ च्या अधिकारातील नियम २००६ च्या क्र. ३३ (३) (सी) अन्वये राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करुन दि. ३० सप्टेंबर २०१४ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हा कामगार मंडळ अधिकारी कार्यालयांना सूचना केली. त्यानुसार राज्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका महानगर पालिका आदी स्थानिक स्वराज संस्थांनी बांधकामाच्या ठिकाणी कामावर असणाऱ्या मजुरांना किमान ९० दिवसांचे प्रमाणपत्र देवून त्यांना नोंदणीकृत करावे असे आदेश दिले होते. यामुळे मजुरांच्या कल्याणासाठी असलेल्या अनेक योजनांचा थेट लाभ त्यांना होवू शकतो. परंतु कोणत्याही ग्रामपंचायती किंवा बांधकामे सुरु असलेल्या कंत्राटदाराकडून कामावरील मजुरांच्या नोंदी न ठेवता त्यांना कामगार कायद्याप्रमाणे त्यांचे हक्क व लाभापासून वंचित ठेवल्या जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे रोजगाराची हमी, त्यासोबतच मजुरांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांचा कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडे अखर्चित आहे. त्याचा उपयोग स्थानिक पातळीवरील कामगार मजुरांपर्यंत पोहचविण्यासाठी तात्काळ प्रशासनाने पावले उचलावी व कुशल कामांवरील इमारत व इतर बांधकामात असलेल्या मजुरांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत, स्थलांतरण थांबवावे, मजुरांना सुरक्षा पुरवावी व सुरु असलेल्या सर्व बांधकामांवर नियंत्रण ठेवावे, अशा मागणी आहे. (वार्ताहर)