शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

वसुली करणाऱ्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:50 PM

५० हजार रुपये वसुली करून एकतर्फी कारवाई करणाऱ्या तहसील ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे५० हजार, मोबाईल घेतल्याचा आरोप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ५० हजार रुपये वसुली करून एकतर्फी कारवाई करणाऱ्या तहसील ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.तहसील पोलीस ठाण्याजवळ १ सप्टेंबरला पावभाजी संचालकावर काही युवकांनी हल्ला केला. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तहसील पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी न करता गुन्हा दाखल करून निर्दोष युवकांविरुद्ध कारवाई केली. याची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक बाल्या बोरकर ३ सप्टेंबरला तहसील पोलीस ठाण्यात गेले. तेथे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी बाल्या बोरकर यांच्याशी वाद घातला. बोरकर यांनी आमदार कृष्णा खोपडे यांना तेथे बोलावले. खोपडे यांनी ९ सप्टेंबरला पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली. दरम्यान, दिनेश आकरे नावाच्या युवकाने त्याच्या जवळून ५० हजार रुपये आणि मोबाईल घेतल्याचे सांगितले. आकरे याच्या म्हणण्यानुसार त्याच्या घरी दोन वाहनात पोलीस आले होते. आकरे आपल्या जवळील ५० हजार, मोबाईल पत्नीला देत होते. पाटील, अनिल चतुर्वेदी, किशोर महंत आणि त्यांच्या साथीदारांनी आकरे यांच्या खिशातून मोबाईल आणि ५० हजार रुपये घेतले. आमदार खोपडे यांनी पाटील यांना सल्ला देऊन पोलीस निरीक्षकांना तक्रार केली. प्रकरण गंभीर होत असल्याचे पाहून मोबाईल, ५० हजार परत करण्यात आले. त्यानंतर आकरेला नेत्याजवळ गेल्यामुळे आणि कामात अडथळा आणण्याची धमकी देऊन कारवाईचा धाक दाखविण्यात आला. या प्रकरणाचा तपास दुय्यम निरीक्षक सागर यांना सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. इतर पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई न झाल्यामुळे असंतोष पसरला आहे.

टॅग्स :RobberyचोरीPolice Stationपोलीस ठाणे