ठळक मुद्देशासकीय कार्यालयात शुकशुकाटअनेक शाळा बंद शासकीय रुग्णसेवेला फटका
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला तीन दिवसीय संप मंगळवारी पहिल्याच दिवशी यशस्वी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. नागपुरातील संविधान चौकात सरकारी कर्मचाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन करून, सरकारवर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण सरकारी यंत्रणा आज रस्त्यावर असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. यामुळे प्रशासकीय कामे खोळंबली. शिक्षक संपात सहभागी झाल्यामुळे बहुतांश शाळांमध्ये सुटीचे वातावरण होते. शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेला फटका बसला.संपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांच्या २३ संघटना व १० संयुक्त कृती समितीने मंगळवारी संविधान चौकात भव्य धरणे कार्यक्रम घेतला. दीड हजारावर कर्मचारी सकाळी ९ वाजतापासून जमले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रहास सुटे यांच्या अध्यक्षतेत सभा झाली. या वेळी तीन दिवसाच्या संपावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.संपात आरोग्य विभागातील परिचारिका, अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका, सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, लिपीक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारतीतील सरकारी कार्यालये, विभागीय आयुक्त कार्यालय, सामाजिक न्याय भवन, या कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला होता. काही शिक्षक संघटनांनी संपात सक्रिय सहभाग घेतला होता, तर काही संघटनांनी संपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे २० टक्के शाळा बंद होत्या. संपात सहभागी न होता फक्त पाठिंबा देणाºया शिक्षकांनी काळ्या फिती लावून अध्यापनाचे काम केले. आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयाच्या परिचारिका, फार्मासिस्ट, शिपाई, शासकीय वाहनावरील ड्रायव्हर, लिपीक संपात सहभागी झाल्याने त्याचा फटका रुग्णसेवेला बसला. शासकीय कामकाजासाठी सरकारी कार्यालयात येणाºया नागरिकांना कर्मचाºयांअभावी रिकाम्या हाताने परतावे लागले. प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांचे परमीट, वाहन हस्तांतरण, शुल्क आकारणी या सर्व प्रक्रिया बंद पडल्या होत्या. अधिकाºयांचा संपात सहभाग नव्हता. मात्र, त्यांच्या अधिपत्याखाली काम करणारे कर्मचारी व शिपाई संपावर गेल्याने अधिकारीही हतबल झाले होेते.सरकारने तोडगा काढावा संपात २३ शासकीय कर्मचारी संघटना आणि १० संयुक्त समितीचे सर्व सदस्य सहभागी झाले. पहिल्याच दिवशी शासकीय यंत्रणेवर मोठा परिणाम झाला. तीन दिवस हीच स्थिती कायम राहील. शासनासोबत आमची चर्चा अजूनही सुरू आहे. आजच्या परिणामाची दखल घेऊन सरकारने त्यावर तोडगा काढावा. चंद्रहास सुटे,अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र