नागपूर : विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणवत्तेचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन करून त्या आधारे शिक्षकांचे वेतन निश्चित करण्याचे शालेय शिक्षण विभागातर्फे धोरण अवलंबले जात आहे. या धोरणाचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे निषेध करण्यात आला. तसेच २००५ पूर्वी व नंतरचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, भविष्य निर्वाह निधीच्या करिता ताबडतोब बीडीएस प्रणाली चालू करा, कोरोनाच्या कर्तव्यावर असताना मृत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख सानुग्रह अनुदान ताबडतोब प्रदान करा, आदी मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. संघटनेचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात अनिल गोतमारे, अविनाश बडे, श्रीधर खेडकर, धनराज राऊत, रमेश काकडे, आदी सहभागी झाले होते.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:07 AM