उमरेड : तालुक्यातील उदासा येथे दिवसागणिक डेंग्यूचे रुग्ण वाढत असून, ग्रामपंचायतीचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांना डेंग्यूची लागण झाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये अधिकांश प्रमाणात लहान मुलामुलींचा समावेश असून ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीने जाणिवेने लक्ष द्यावे. स्वच्छता मोहीम राबवून योग्य फवारणी करण्यात यावी, अशी मागणी पांडुरंग शेगर यांनी केली आहे. याबाबत पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव यांच्याकडे विचारणा केली असता, आम्ही पाहणी केली असून सध्या संपूर्ण प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले.
खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी उदासा येथे भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पांडुरंग शेगर, किसन बाबर, भाऊराव भोयर, पांडुरंग खिल्लारे, राजेश्वर तांबू, पुंडलिक भोयर, शामराव खडसान, संजय मांडवकर, भाऊराव खिल्लारी, लक्ष्मीपती खिल्लारे, नेमाजी वराडे, भाऊपती बाळनाथ, रणजित खिल्लारे, प्रवीण भोयर, प्रफुल रामटेके, प्रकाश शेलोटे, परबत शेगर, सुरेश शेगर, शिवनाथ खिल्लारे, पारस बाळनाथ, रोशन वासनिक, आनंद डोंगरे आदी गावकरी उपस्थित होते.