लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डासांच्या प्रादुर्भावाला घेऊन उच्च न्यायालयाने नगरसेवकांना फटकारले आहे, असे असताना नगरसेवकांच्याच घरी डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या कन्येला व भाजपाचे उपनेता व माजी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्या मुलाला डेंग्यूचे निदान झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. परंतु याच विभागाच्या चमूने यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता चक्क डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे कुणाला जबाबदार धरावे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.एकीकडे सण उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे डेंग्यू गंभीर रुप धारण करीत आहे. डेंग्यूसदृश आजराचे तर घराघरांमध्ये रुग्ण दिसून येत आहे. डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. यामुळे आजार गंभीर होताच थेट जीवाला धोका निर्माण होतो. सध्या शहरात १०५ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जोशी यांच्या मुलीला डेंग्यू झाल्याचे वृत्त झळकताच खळबळ उडाली. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने ते राहात असलेल्या लक्ष्मीनगरातील निवासस्थानाची पाहणी केली. त्यावेळी जोशी यांच्या घरातील कुंडीतच डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. जोशी यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. यातच शुक्रवारी बाल्या बोरकर यांच्या मुलाला डेंग्यू झाल्याचे निदान झाल्याचे समोर येताच चर्चेला पेव फुटले आहे. मुलाला डेंग्यू होण्यापूर्वी त्यांच्या छापरू नगर गरोबा मैदान येथील घरात आरोग्य विभागाला डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या होत्या. विशेष म्हणजे, डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्यावतीने घराघरांची झाडाझडती घेतली जात आहे. परंतु अपुºया कर्मचाऱ्यांमुळे विभागाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे वास्तव आहे. यातच वारंवार तपासणीत एकाच घरात डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असताना त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या विभागाला नाही. यामुळे केवळ जनजागृतीच्या भरवशावर हा विभाग डेंग्यूवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. मुंबईमध्ये मात्र डेंग्यूच्या अळ्या आढळून येणाऱ्या घरांवर दंडात्मक कारवाई केली जाते. नागपूरमध्ये तसे अधिकार या विभागाला देण्याबाबतचा प्रस्ताव आहे, परंतु लोकप्रतिनिधींचा उदासीनपणामुळे त्याला मंजुरी मिळाली नाही. परीणामी, अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
नागपुरात नगरसेवकांच्याच घरी डेंग्यूच्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:44 PM
डासांच्या प्रादुर्भावाला घेऊन उच्च न्यायालयाने नगरसेवकांना फटकारले आहे, असे असताना नगरसेवकांच्याच घरी डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या कन्येला व भाजपाचे उपनेता व माजी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्या मुलाला डेंग्यूचे निदान झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. परंतु याच विभागाच्या चमूने यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता चक्क डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे कुणाला जबाबदार धरावे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
ठळक मुद्देजबाबदार कोण? : संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबीकडे दुर्लक्ष