शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
3
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
4
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
5
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
6
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
7
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
8
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
9
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
10
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
11
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
12
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
13
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
14
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
15
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
16
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
17
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
18
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
19
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन

‘अलिगड’च्या प्रदर्शनावर स्थगितीस नकार

By admin | Published: February 26, 2016 3:10 AM

समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या एका दिवंगत प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित ‘अलिगड’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यास

हायकोर्ट : समलैंगिक प्राध्यापकाच्या जीवनावरील चित्रपटनागपूर : समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या एका दिवंगत प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित ‘अलिगड’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या चित्रपटाविरुद्ध संबंधित प्राध्यापकाच्या लहान भावाने रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्यास नकार देऊन प्रतिवादींना उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला. प्रतिवादींमध्ये केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव, सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनचे संचालक, चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता आदींचा समावेश आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास संबंधित प्राध्यापकाची सर्वत्र बदनामी होईल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीने संबंधित प्राध्यापकाची भूमिका केली आहे. संबंधित प्राध्यापक अलिगड मुस्लिम विद्यापीठात होते. ९ फेब्रुवारी २०१० रोजी त्यांच्या समलैंगिकतेची सवय पुढे आली. यानंतर ९ एप्रिल २०१० रोजी ते स्वत:च्याच फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले. ‘अलिगड’ चित्रपट कोठेही व कोणत्याही पद्धतीने दाखविण्यावर बंदी आणावी, सेंसर बोर्डाने चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र परत घेण्यात यावे आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे चित्रपट निर्मात्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी याचिकाकर्त्याची विनंती होती. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एम. अनिलकुमार यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)