लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) शैक्षणिक सत्र जुलै २०१८ पासून सुरू होत आहे. ‘एम्स’ एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा समुपदेशनाला सुरुवातही झाली आहे. यातून निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांची तात्पुरती निवासाची व्यवस्था शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्याचे ठरले होते. परंतु दरम्यानच्या काळात वसतिगृहाच्या हस्तांतरणाला घेऊन तणवाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता चर्चेअंती दंत महाविद्यालयाने २२ खोल्या देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी या सर्व खोल्यांचा ताबा ‘एम्स’ व्यवस्थापनेकडे सुपूर्द करण्यात आला.मिहानमधील २५२ एकरमध्ये उभारण्यात येणाऱ्या ‘एम्स’च्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. याला पूर्ण व्हायला सुमारे चार वर्षांचा कार्यकाळ लागणार आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत ‘एम्स’च्या एमबीबीएसचे वर्ग मेडिकल महाविद्यालयात भरणार आहेत. ‘एमबीबीएस’ च्या ५० जागांवर जुलै २०१८ पासून प्रवेश दिला जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्याचे मागील महिन्यातच ठरले होते. त्यानुसार गेल्या महिन्यात वसतिगृह ताब्यात घेण्यावरून बैठक घेण्यात आली. यात ‘एम्स’चे समन्वयक अधिकारी डॉ. विरल कामदार, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, शासकीय दंत महाविद्यालयाचा अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर व एम्सचे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार बक्षी उपस्थित होते. बैठकीत ३६ खोल्यांच्या या वसतिगृहातील १८ खोल्यांमध्ये शासकीय दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी राहत असल्याच्या विषयाला घेऊन ताण वाढला. अखेर मधला मार्ग काढीत उर्वरित १८ खोल्या ‘एम्स’कडे हस्तांतरीत करण्याच्या आणि एका खोलीमध्ये दोन विद्यार्थी असे एकूण ३६ विद्यार्थ्यांच्या निवासी व्यवस्था या वसतिगृहात करण्याचे ठरले. परंतु उर्वरित १४ विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली होती. बुधवारी डॉ. विरल कामदार यांनी मध्यस्थी केल्याने अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी आणखी सहा खोल्यांचे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील एकूण ३६ खोल्यांमधील २२ खोल्यांमध्ये ‘एम्स’चे विद्यार्थी तर उर्वरित १४ खोल्यांमध्ये दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी राहणार आहेत. विशेष म्हणजे, या वसतिगृहात ‘एम्स’चे मुले-मुली एकत्र निवासाला असणार आहे.
दंत महाविद्यालयाचे वसतिगृह ‘एम्स’च्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 10:50 PM
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) शैक्षणिक सत्र जुलै २०१८ पासून सुरू होत आहे. ‘एम्स’ एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा समुपदेशनाला सुरुवातही झाली आहे. यातून निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांची तात्पुरती निवासाची व्यवस्था शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्याचे ठरले होते. परंतु दरम्यानच्या काळात वसतिगृहाच्या हस्तांतरणाला घेऊन तणवाची स्थिती निर्माण झाली होती.
ठळक मुद्दे२२ खोल्यांचे हस्तांतरण : एमबीबीएसच्या ५० विद्यार्थ्यांची होणार निवासाची सोय