शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
2
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
3
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
4
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
5
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
6
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
7
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
8
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
9
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
10
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
11
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
12
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
13
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
14
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
15
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
16
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
17
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
18
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
19
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
20
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."

आजी-माजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांची लवकरच विभागीय चौकशी

By गणेश हुड | Published: June 08, 2024 8:09 PM

अंगणवाडी साहित्य घोटाळा : १३ ठिकाणी पुरवठादारांच्या विरोधात गुन्हा दाखल

नागपूर : जिल्हा परिषदेतील एक कोटी ६ लाख रुपयाच्या अंगणवाडी साहित्य घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावर चौकशी समितीने अहवालात ठपका ठेवला आहे. पोलीस चौकशी अहवालात दोषारोप पत्रात आरोप निश्चित केल्यानंतर यात दोषी आढळल्यास लवकरच आजी-माजी उमुख्यकार्यकारी अधिकारी यांची विभागीय चौकशी करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेतर्फे विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविला जाणार आहे. याला मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी दुजोरा दिला.

उपमुख्यकार्यकारी अधिकारी भागवत तांबे व तत्कालीन उपमुख्यकार्यकारी अधिकारी दामोदर कुभरे यांच्या कार्यकाळात ही अनियमितता घडली आहे. या प्रकरणात ११ सीडीपीओ यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी यापूर्वीच जारी केले आहे. तसेच पोलीस चौकशीदरम्यान महिला व बाल कल्याण विभाग प्रमुखांच्या विरोधात पोलीस चौकशीदरम्यान गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ११ सीडीपीओ यांच्यापाठोपाठ विभाग प्रमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तीन पुरवठादारांच्या विरोधात गुन्हा दाखलजिल्हा परिषदेच्या ४९ अंगणवाड्यांना ९८ लाखांचे साहित्य पुरवठा करण्याचे कंत्राट दिलेल्या तीन पुरवठादारांच्या विरोधात तालुकास्तरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात यवतमाळ येथील श्री बूक डेपो अॅन्ड जनरल स्टोअर्स , नागपूर येथील शांभवी एज्युकेशन एड्स व संजीवनी उद्योग यांचा समावेश आहे. या पुरवठादारांनी बाजारभावापेक्षा जादा दराने साहित्याचा पुरवठा करून बिलाची उचल केली. पुवठादारांकडे परवाना नसताना कंत्राट घेवून शासनाची फसवणूक केली. कंत्राटदारांकडून ७४ लाख ४६ हजार ८२४ ते ८५ लाख ४०हजार ७०० रुपये वसुलीस पात्र असल्याचे तीन सदस्यीय चौकशी समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर