लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोट्यवधींच्या ठेवी घेऊन फरार झालेले गणेशनगर येथील श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे यांच्या नंदनवन, शिवनगर येथील घराला जवळपास १५० पेक्षा जास्त ठेवीदार आणि खातेदारांनी गुरुवारी रात्री घेराव घातला आणि निदर्शने केली. पोलिसांनी बळजबरीने आम्हाला हाकलून लावल्याचा आरोप ठेवीदारांनी लोकमतशी बोलताना केला.प्राप्त माहितीनुसार, सोसायटीत मजुरापासून श्रीमंतांचे कोट्यवधी रुपये गुंतले आहेत. मेहरकुरे यांनी ठेवीदार आणि खातेदारांच्या पैशातून अवैध जमिनी विकत घेतल्या असून अन्य व्यवसायातही गुंतवणूक केली आहे. त्यांना योग्य परतावा न मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे फसले आहेत. याची माहिती ठेवीदारांना झाल्यानंतर पैसै काढण्यासाठी अध्यक्षांशी संपर्क साधला. पैसे परत करतो, अशा भूलथापा चार महिन्यांपासून देऊन ते ठेवीदारांची बोळवण करीत आहेत. एक महिन्यांपूर्वी जवळपास ३०० पेक्षा जास्त खातेदार आणि ठेवीदारांनी खेमचंद मेहरकुरे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसात तक्रार नोंदविली. त्यावेळी मेहरकुरे स्वत: ठाण्यात हजर होऊन १ एप्रिलपासून सर्वांना ठेवी परत करणार असल्याचे आश्वासन ठेवीदारांना दिले होते. त्यानंतर ठेवीदाराच्या मोबाईलवर तुम्हाला पैसे देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. १ एप्रिलपूर्वीच ते मोबाईल बंद करून फरार झाले आहेत. तेव्हापासून ठेवीदार संतप्त असून त्याच्या पत्नीला जाब विचारात आहेत. ते कुठे गेले, हे माहीत नसल्याचे पत्नीचे उत्तर आहे. पोलीस खेमचंदला ताब्यात घेण्याची कोणतीही कारवाई करीत नाहीत, असा ठेवीदारांचा आरोप आहे.अध्यक्षांच्या जमिनी संचालकांनी घेतल्या ताब्यातअध्यक्षांनी खरेदी केलेल्या जमिनी सोसायटीच्या काही संचालकांनी ताब्यात घेऊन स्वत:च्या नावाने रजिस्ट्री केल्याची माहिती ठेवीदारांनी दिली. त्यामुळे खेमचंदकडे कुठल्या जमिनी शिल्ल्क नाहीत आणि आम्हाला पैसे मिळणार नाहीत, अशी भीती ठेवीदार आणि खातेदारांमध्ये आहे.सोसायटीचे ऑडिट सुरूजवळपास ४० कोटींच्या आर्थिक घोटाळ्यानंतर जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी पुढाकार घेत मागील तीन आर्थिक वर्ष आणि चालू वर्षाचे सोसायटीचे ऑडिट करण्याचे आदेश जिल्हा विशेष अंकेक्षक अनिल पाटील यांना दिले आहे. त्यानुसार पाटील यांनी चार अंकेक्षकाची नियुक्ती केली असून एक महिन्यात अहवाल येणार आहे. त्या आधारे सोसायटीच्या संचालक मंडळावर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी सोसायटीला एका सीए अंकेक्षकाने ‘अ’ ऑडिट वर्ग दिला होता, हे विशेष.
श्रीराम अर्बनच्या अध्यक्षांच्या घराला ठेवीदार व खातेदारांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:53 PM
कोट्यवधींच्या ठेवी घेऊन फरार झालेले गणेशनगर येथील श्रीराम अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे यांच्या नंदनवन, शिवनगर येथील घराला जवळपास १५० पेक्षा जास्त ठेवीदार आणि खातेदारांनी गुरुवारी रात्री घेराव घातला आणि निदर्शने केली. पोलिसांनी बळजबरीने आम्हाला हाकलून लावल्याचा आरोप ठेवीदारांनी लोकमतशी बोलताना केला.
ठळक मुद्देकोट्यवधींचा घोटाळा : ठेवीदारांचा आरोप