लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन काळातील गरिबांचे विजेचे बिल माफ करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शनिवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. इंदोरा मैदान येथून मोर्चा निघाला. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराकडे हा मोर्चा जात असताना पोलिसांनी इंदोरा चौकातच अडवला आणि मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. सर्व मोर्चकऱ्यांना पोलीस मुख्यालयात आणून नंतर सोडण्यात आले. दरम्यान, मागणीचे निवेदन शिष्टमंडळातर्फे सादर करण्यात आले.
या मोर्चात शहर अध्यक्ष रवी शेंडे, राजू लोखंडे, इंजि. राहुल वानखेडे, प्रफुल माणके, विवेक हाडके, नागेश बुरबुरे, इंजि. राहुल दहिकर, प्रा. अजयकुमार बोरकर व मंगलमूर्ती सोनकुसरे, विलास वाटकर, सुनील इंगळे, आनंद चौरे, मुरलीधर मेश्राम गुरुजी, डॉ. धर्मेंद्र मंडलिक, नालंदा गणवीर, माया शेंडे, सुजाता सुरडकर, कांचन देवगळे, नीलिमा डंभारे, वर्षा धरगावे, समिता नंदेश्वर, संजय सूर्यवंशी, प्रवीण पाटील, निर्भय बागडे, सोनू चहांदे, बालू हरकंडे, अमरदीप तिरपुडे, सुमधू गेडाम, अंकुश मोहिले, सिद्धांत पाटील, प्रशांत नारनवरे, दिनकर वाठोरे, विशाल वानखेडे, कमलेश शंभरकर, मिलन सहारे वानखेडे, रमेश कांबळे, शिशुपाल देशभ्रतार, धम्मदीप लोखंडे, अतुल गजभिये, अविराज थूल, अनिल धराडे, संजय वानखेडे, मनोज वाहाणे, राजेश पाटील, निशांत पाटील, अर्जुन हलमारे, संघपाल गाडेकर, भरत लांडगे, गोवर्धन भेले आदी सहभागी झाले होते.